संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मोहल्यातील जागरूक नागरिकांनी आरोपीस रंगेहात पोलीसाना पकडुन दिले.
कन्हान : – मोहल्यात घरी एकटा राहणा-या नराधमा ने गावात बेवारस फिरणा-या वेळसर महिलेला घरी आणुन तिच्या सोबत जबरी संभोग करून आपली भुक भागविण्याकरिता घाणरडे कृत्य करणारा आरोपी अनिल हांडा यास मोहल्यातील जागरूक नागरिकांनी पोलीसाना रंगेहात पकडुन दिल्याने कन्हान पोलीसा नी आरोपीस अटक करून वेळसर महिलेस मनोरूग्ना लय पागलखाना नागपुर येथे दाखल करून वेळसर महिलेला मदतीचा हात दिला.
विवेकानंद कन्हान येथील रहिवासी अनिल हांडा नावाचा इसम घरी एकटाच राहत असुन त्याची पत्नी मरण पावली व त्यास मुलाबाळ नाही. अनिल हांडा हा कधी कधी त्याचे घरी गावात फिरणा-या वेळ सर महिलेला त्याचे घरी आणत असतो व त्याच्या सोब त शारीरिक संभोग करत असतो. एक वर्षा पूर्वी त्यास मोहल्ल्यातील पुरूषोत्तम लांजेवार, बबन सावरकर, हरिश पोटभरे, नरेंद्र कुर्वेकर आदी लोकांनी एका वेळ सर महिले सोबत पकडले होते. परंतु मोहल्ल्यातील लोकांनी त्यास एक वेळा माफ करा ” असे म्हटल्याने त्यावेळी पोलिसांना तक्रार केली नव्हती. बुधवार (दि. १९) जुलै २०२३ चे सायंकाळी ८ वाजता सुमारास अनिल हांडा हा एका वेळसर महिला वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष जिने अंगात लाल, पिवळ्या रंगाचा कुर्ता व पायात आकाशी रंगाचा सलवार घातलेला आणि तिचे डोक्यावर काळे पांढरे लहान केस मुला सारखे असले ल्या महिलेस घरी घेवुन जावुन तिचे सोबत जबरी संभोग करतांना मिळुन आला. आज सुद्धा वेळसर महिले सोबत अशेच घाणेरडे कृत्य करेल आणि मोह ल्यात असे कृत्य नेहमी बरे नाही म्हणुन मोहल्ल्यातील किशोर बेलसरे, पुरूषोत्तम, हरिश पोटभरे, बबन सावर कर, जनार्धन बागडे, अरूण पोटभरे, गणेश मेश्राम, नरेंद्र कुवेंकर व शकिला वाहिद शेख आदी एकत्र येत विचारविमर्स करून कन्हान पोलीसांना माहिती दिल्या ने काही वेळातच पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहचुन पोलीसांनी अनिल हांडा चे घरी जावुन त्यास आवाज दिला असता अनिल हांडा याने दार उघडले तेव्हा तो कमरेत दुपट्टा गुडुन होता. आम्ही पोलीसांसोबत त्याचे रूम मध्ये गेलो तर त्याचे बेडरूम मध्ये दिवाणावर त्या चे सोबत घरी नेलेली वेळसर महिला ही झोपलेली दिसली. तिचा सलवार दिवानचे खाली पडलेला होता व ती अर्धनग्न अवस्थेत होती. सदर रूमची परिस्थिती पाहिल्यावर अनिल हांडा याने वेळसर महिले सोबत जबरी संभोग केला असावा असे लक्षात आले. अनिल हांडा याने या वेळसर महिलेशी जिला बोलता व स्वत: चे नाव सुद्धा सांगता येत नाही. अस्या वेळसर महिले सोबत जबरी संभोग सारखे घाणेरडे कृत्य केल्याने कन्हान पोलीसानी फिर्यादी पुरूषोत्तम लांजेवार वय ४० वर्ष रा. विवेकानंद नगर कन्हान यांचे तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला आरोपी अनिल हांडा यांचे विरूध्द अप क्र ४६३/२०२३ कलम ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एल) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली असुन वेळसर महिलेची वैद्यकिय तपासणी करून नागपुर येथील पागलखाना मनोरूग्नालयात दाखल करण्यात आले. कन्हान पोलिस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.