नागपूर :- गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत, मोठा ताजबाग मागील सरकारी शौचालय जवळ एक खुनाचे गुन्हयातील फरार आरोपी ईसम हजर आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन मिळालेल्या वर्णनाचा ईसम पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना, त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव शाम सुभाष जोगदंड, वय २८ वर्षे, रा. नेताजी नगर, दारव्हा रोड, आंबेडकर पुतळ्या जवळ, जि. यवतमाळ, पोलीस ठाणे लोहारा असे सांगीतले. त्यास लोहारा, यवतमाळ येथील गुन्ह्याबाबत विचारले असता, त्याने दिनांक ०२.०६.२०२४ रोजी वैयक्तीक भांडणाचे कारणावरून लोहारा येथे राहणारा हेमंत कांबळे याचा धारदार शस्त्राने खुन केल्याचे व तेव्हापासून नमुद गुन्ह्यात पसार असल्याचे सांगीतले. आरोपीबाबत पोलीस ठाणे लोहारा, जि. यवतमाळ येथे संपर्क करून माहीती देण्यात आली. आरोपीचा अभिलेख तपासला असता, त्याचे विरुध्द जि. यवतमाळ येथील वेगवेगळ्या पोलीस ठाणे अंतर्गत एकुण १८ गुन्हे दाखल असल्याचे समजले. पोलीस ठाणे लोहारा, जि. यवतमाळ येथून आरोपीस हद्दपार केले असल्याची माहीती प्राप्त झाली. आरोपीस पुढील योग्य कार्यवाहीस्तव लोहारा, यवतमाळ पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, मषोनि, कविता ईसास्कर, नापीअं. शेषराव राऊत, अश्विन मार्ग, पोअं. कुणाल मसराम, समिर शेख, नितीन वासने, कमलेश क्षिरसागर व मनापोअं. आरती चव्हाण यांनी केली.