नागपूर :- पोलीस ठाणे सदर हद्दीत सन १९९२ मध्ये दाखल कलम ३२५, ३४ भा.द.वि. चे गुन्हयातील आरोपी नामे जगदीश हम्पी कनोजीया, वय ५४ वर्षे, रा. गवळीपुरा, नागपुर हा जामीनवर आल्यापासुन कोर्टात हजर न झाल्याने न्यायालयाने त्याचा पकड वॉरंट काढलेला होता, आरोपी मिळुन न आल्याने न्यायालयाने त्यास फरार घोषीत केलेले होते. सदर पोलीसांनी आरोपीचा शोध घेवुन दिनांक २८.०१.२०२५ रोजी आरोपीस पोलीस ठाणे सदर हद्दीतील गवळीपुरा परीसरातुन ताब्यात घेतले. आरोपीला मा. न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले आहे.
वरील कामगिरी राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परि. क. ०२), सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वयोनि. मनिष ठाकरे, पोहवा. नरेंद्र कलनायके, श्रीकृष्ण शेरकी व पोअं. रंजीत दानेकर यांनी केली.