संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेला येणार गती
कामठी :- भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर परिषद प्रशासक उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांना दिलेल्या निर्देशानुसार पट्टे वाटप सर्वे चा अखेर शुभारंभ करण्यात आला
नगर परिषद चे माजी विरोधी पक्ष नेते लालसिंग यादव यांच्या नेतृत्वात भाजपा कामठी शहरध्यक्ष माजी नगरसेवक संजय कनोजिया, संध्या रायबोले, प्रतिक पडोळे, पिंकी वैद्य, हर्षा यादव यांनी चंद्रशेखर बावनकुले याना प्रत्यक्ष भेटून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रखड़लेली प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पट्टे वाटप प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली होती.
याबाबत चंद्रशेखर बावनकुले यांनी नगर परिषद प्रशासक उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर याना तातडीने आवश्यक निर्देश देऊन पट्टे वाटप ची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले
त्यानुसार नगर परिषद कामठी प्रभाग 15 तील रमानगर, शिवनगर, विक्तुबाबा नगर, रामगढ़ ,आनंद नगर, गौतम नगर, सुदर्शन नगर, समता नगर, सैलाब नगर, भागात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनासाठी पट्टे वाटप सर्वे चे काम नुकतेच सुरु करण्यात आले
एस डी इंटरप्राइजेस कंपनी नागपुरला सर्वे चे काम देण्यात आले असून कंपनी चे संचालक योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनात गूगल मैप च्या सहायताने कपूरचंद लिल्हारे, हर्षल गायधने, अनुप प्रजापति, मोहम्मद शहनवाज़, रामप्रकाश प्रजापति, अब्दुल अजीज, सादिक समीर आदी अधिकारी घरोघरी जाऊन अतिक्रमित घरांचे एकून क्षेत्रफळ मोजून पट्टे करिता सर्वे करित आहेत.
– अतिक्रमण झालेल्या घरांची मोजणी झाल्यावर उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांची संयुक्त समिति पट्टयाच्या मसुदयाला अंतिम मंजूरी देतील त्या नंतर मोलमजूरी करून कच्चा घरात राहणाऱ्या नागरिकाना हक्काचे घर प्रधानमंत्री आवास योजनेतुन मिळणार – उज्वल रायबोले महामंत्री भाजपा कामठी शहर