तरुणाचा अपघाती मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा रहिवासी व खैरी च्या मूर्ती कंपनीत काम करीत असलेल्या एका विवाहित तरुणाचा कामाहुन दुचाकीने घरी परत येत असताना खैरी एच पी पेट्रोल पंप समोर अपघाती जख्मि झाल्याची घटना 21 जून ला रात्री 10 दरम्यान घडल्याने सदर जख्मि तरुण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत उपचारार्थ दाखल होते उपचारादरम्यान सदर तरुणाचा आज सकाळी मृत्यू झाला असून मृतक तरुणाचे नाव सुरज वासनिक वय 40 वर्षे रा येरखेडा कामठी असे आहे.

सदर मृतक तरुणाचे आई वडील नुकतेच मरण पावले असुन आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.मृतकाच्या पार्थिवावर आज नविन मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जन्माला येण्यापुर्वीच अज्ञात आरोपीने चिमुकल्या मुलीचे छत्र हिरावले

Thu Jun 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  –  नीतिन ठाकरे चा बखारी ते मेंहदी रसत्यावरील पुलाजवळ गळा कापलेला मुतदेह आढळला.  कन्हान :- एंसबा ( नांदगाव) येथील मृतक नीतिन खुशालजी ठाकरे वय ३५ वर्ष हा पत्नी दीपाली नीतिन ठाकरे ही ९ महिन्याची गरोदरला नागपुर येथिल डागा रूग्णालयात प्रसुतीकरिता भर्ती करून सायंकाळी ४.३० वाजता सासुरवाडी जुनीकामठी ला जावुन परत सायंकाळी ७.३० वाजता नीतिन एंसबा घराकडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com