संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा मार्गावरील ऑरेंज सिटी लोहा कंपनीत कार्यरत तरुणाचा कामादरम्यान कंपनीतील वजनी लोह्याचा एंगल चेहऱ्याला लागल्याने घडलेल्या या गंभीर अपघातात उपचारादरम्यान आज दुपारी 1 दरम्यान कामगार तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव सचिंद्र खरोले वय 35 वर्षे रा आनंद नगर,रामगढ, कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा मंगळवारी सकाळी 8 वाजता ऑरेंज सिटी लोहा कंपनीत कामावर गेले असता मॅनेजर ने डबल ड्युटी करण्याचे आदेशीत केल्याने आदेशाचे पालन करीत काम करीत असता बुधवारी सकाळी सहा वाजता कंपनीतील वजनी लोह्याचा अँगल सदर मृतक तरुण कामगाराच्या चेहऱ्याला लागलेल्या गंभीर अपघातात उपचारार्थ कामठी च्या आशा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
परिस्थिती नाजूक असून सदर मृतक हा कोमा मध्ये गेला असल्याने अति दक्षता उपचार गृहात उपचार सुरू होता.मात्र उपचारादरम्यान सदर तरुणाचा आज दुपारी 1 दरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र शोकळला पसरली .मृतकाच्या आप्तस्वीकाय सह संबंधितांनी आशा हॉस्पिटल गाठून तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले.मृतकाच्या कुटुंबियांकडून मृतकाच्या पत्नीला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
पोलिसांनी वेळीच आशा हॉस्पिटल गाठून तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तसेच मृतकाच्या पाठीमागे आई,वडील,पत्नी,एक मुलगी व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.