दुचाकीवरून खाली पडल्याने विवाहित तरुणाचा अपघाती मृत्यु

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 17:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भोयर कॉलेज समोरून दुचाकीने जात असलेल्या तरुण भोवळ येऊन खाली पडून जख्मि झाला असता उपचारार्थ त्याला नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता सदर जख्मि तरुणाच्या डोक्याला जबर जखम असल्याने नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले मात्र सदर तरुणाचा मृत्यू झाला असून मृतक तरुणाचे नाव अमर मेश्राम वय 40 वर्षे रा.जयभीम चौक कामठी असे आहे.ही घटना काल सकाळी साडे आठ दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक तरुण हा कुटुंबाचा कर्ता व्यक्ती असून कुटुंबात पत्नी व दोन चिमुकल्या मुली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मजूर कामातून करायचा.काल सकाळी 8 दरम्यान सकाळी उठुन दुचाकी क्र एम एच 40 ए डब्लू 4089 ने कुंभारे कॉलोनी रहिवासी नातेवाईकांना भेटून भोयर कॉलेज मार्गे घराकडे जात असता अचानक भोवळ आल्याने सदर तरुण दुचाकीहुन खाली पडला असता डोक्याला झालेल्या जबर जख्मि मुळे अखेर त्या तरुणाचा तडकाफडकी मृत्यू झाला.पोलिसांनी यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबियासह जयभीम चौकात शोककळा पसरली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मानेवाडा 'आरोग्यवर्धिनी केंद्रात' आरोग्यवर्धिनी दिन साजरा

Sun Apr 17 , 2022
नागपूर : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेला ४ वर्षे पूर्ण झाली. या योजनेचा स्थापना दिवस आरोग्यवर्धिनी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शनिवारी (ता. १६) मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आरोग्यवर्धिनी दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कंवर, शहर कार्यक्रम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com