संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील वराडा येथे जिल्हा परिषद शाळेत “शिक्षण सप्ताह” निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्राम पंचायत सरपंच सुनिल जामदार यांचे द्वारे विद्यार्थांना स्नेह भोजन करुन शैक्षणिक सप्ताह कार्यक्रमाची सांगता थाटात करण्यात आली.
केंद्रशासन निर्देशानुसार संपुर्ण देशभरात दि. २२ ते २८ जुलै २०२४ या दरम्यान ” शिक्षण सप्ताह ” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत उपक्रमांतर्गत आठवड्यातील प्रत्येक दिवशी एका विशिष्ट उपक्रमाचे आयोजन करून शिक्षण सप्ताहाची सांगता रविवार (दि.२८) जुलै २०२४ ला ” समुदाय सहभाग दिवस”, तिथी भोजन ( स्नेह भोजन) उपक्रमांतर्गत “समु दास सहभाग दिवस” या दिवशी पारशिवनी तालुक्यातील वराडा जिल्हा परिषद शाळेत ग्राम पंचायत सरपंच सुनिल जामदार यांचे द्वारे विद्यार्थांना स्नेह भोजन करुन शैक्षणिक सप्ताह उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी वराडा ग्रा.प.सरपंच सुनिल जामदार, शिक्षक प्रतिक गोपनारायण, उपसरपंच भोजराज काकडे, सदस्य रविन्द्र खिळेकर, पोलीस पाटील संजय नेवारे, आंगनवाडी सेविका सुनिता घोडमारे, मदतनिश विद्या रामटेके, राहुल खोब्रा गडे, रोशन जामदार, उमेश मेश्राम, सावन पाटील, अमोल देऊळकर, अंकित जामदार, योगेश जामदार सह शिक्षिका व नागरिक उपस्थित होते.