नागपूर :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. अभाविप नेहमीच शिक्षण क्षेत्रात गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मंच प्रदान करते. विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी हितासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे.
नुकतेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने PET परीक्षेचे परिपत्रक काढले त्यात विद्यार्थ्यांना आभासी पद्धतीने संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून परीक्षा फॉर्म भरावयाचा असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी वंचित राहिले आहे. त्याकरिता आज अभाविप नागपूर महानगर द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र–कुलगुरू राजेंद्र काकडे यांना निवेदन देऊन पेट प्रवेश परीक्षेच्या फॉर्मची 10 दिवसांनी मुदत वाढविण्याची मागणी यावेळी विद्यार्थी परिषदेने केली, जेणेकरून परीक्षा फॉर्म भरण्यापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल. यावेळी नागपूर महानगर मंत्री दुर्गा भोयर, नागपूर महानगर सहमंत्री शुभ जयस्वाल, धरमपेठ नगर अध्यक्ष किशोर पाटिल व सर्व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
वरील सर्व माहिती नागपूर महानगर मिडिया संयोजक ऋत्विक डोंगरवार यांनी पाठविली.