मुख्यमंत्री लाडकी बहिण योजेतील जाचक अटी रद्द करा !

– हजारो वंचित महिलांना योजनेत सहभागी करून घेण्याची मागणी ! 

मोर्शी :-  राज्यातल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये अनेक महिला अपात्र ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून या योजनेसाठी चार चाकी वाहनाची अट, उत्पन्नाची अट, ६० वर्ष वयाची अट, जमिनीची अट, अधिवास प्रमाणपत्राची अट, तहसीलदार यांच्या उत्पन्न दाखल्याची अट रद्द करून तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा यासह विविध जाचक रद्द करून सरकारने विविध अटी शिथिल कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितददा पवार यांच्याकडे केली आहे.

लाडकी बहीण योजनेत बदल केल्यास मोठ्या प्रमाणत महिलांना या योजनेत सहभागी होता येणार असून यातील काही नियम सरकारने शिथिल केल्यास या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे.

ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार ६० वर्षा वरील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे ६० वर्षांवरील महिलांना श्रावण बाळ योजनेचा लाभ ६५ वर्ष वय झाल्यानंतर मिळत असल्यामुळे ६० ते ६५ वर्षांमधील महिला या योजनेपासून वंचित राहणार आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरातील कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही या योजनेसाठी हजारो महिला अपात्र ठरणार आहे. त्यामुळे शासनाने गरजू वंचित महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी करून घेण्यासाठी विविध अटी शिथिल करून त्यांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिम्बॉयोसिस स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर अँड डिझाईन एसएसपीएडी प्राध्यापकांनी पर्स्पेक्टिव्ह 2024 मध्ये ओरिगामी कार्यशाळा घेतली

Wed Jul 3 , 2024
नागपूर :- Ar.प्रथमेश संजय वाली ओकर एसएसपीएडी, नागपूरच्या प्राध्यापक सदस्या, पर्स्पेक्टिव्ह 2024 चा एक भाग म्हणून ओरिगामी कार्यशाळा प्रेस क्लब, सिव्हिल लाइन्स येथे आयोजित केली होती. सौरभ डिझाईन द्वारा आयोजित डिझाईन बूटकॅम्प २ जून रोजी ओरिगामीचे मूलतत्त्वे एक कला प्रकार म्हणून, तिचा विकास, जपानी संस्कृतीत त्याचे महत्त्व आणि त्याचे वैशिष्ट्य असे होते. या सत्रा दरम्यान Ar. प्रथमेश प्रात्यक्षिके द्वारे त्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com