काटोल :- काटोल सावरगावं मार्गावरील जांब नदी पुलावर भरधाव ट्रेलर जागीच ब्रेक दाबल्याने विरुद्ध दिशेला असलेल्या दुचाकीवरील युवकाच्या अंगावर गेले यात युवक ट्रेलरच्या आतमध्ये तब्बल 1 तास फसून जीवनाची झुंज दिली मोठ्या मश्यागतीने काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता युकाचा मृत्यू झाला युवकाच्या मृत्याने शहरातील हळहळ व्यक्त केली जात आहे.योगेश रिठे (32) राहणार काळे चौक काटोल असे मृतक तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीवरून योगेश हा नेहमीप्रमाणे नदी पलीकडे असलेल्या आपल्या शेतातून त्याच्या नवीन ज्युपिटर गाडी क्रमांक ने पुलावरून डाव्या बाजूने येत असताना पुलावच्या कडेला थाबला होता तर गळपुरा चौकाकडून सावरगावं रोडकडे जाणारा ट्रेलर क्रमांक सी जी 13 एल 4651 भरधाव पणे येत होता अचानक मधून येणाऱ्या मार्गाने एक दुचाकी आल्याने ट्रेलरने जागेवर ब्रेक दाबले यात ट्रेलरचा मुंडा थोडा विरुद्ध दिशेने तर मागील ट्रेलर पूर्ण पणे विरुद्ध दिशेने आला व तो योगेशच्या गाडीवर गेला यात ट्रेलर मुंद्याचे दोन चाक पुला खाली गेले यात मृतक व त्याची गाडी फसली अक्षरशः थरारक रित्या योगेशचा कंबरेपासूनचा खालील भाग दबला तर वरचा भाग पूलखाली लटकट होता थरारा सतात 1 तास चालू होता.
यात नदीखालुन लावलेली लाकडी सीडी सुद्धा तुटली यात त्याला काढण्याच्या प्रयत्नात असलेला युवक सुद्धा खाली पडला खाली पाल असल्याने दोघेही खालच्यानी झेलल्या गेले तोवर योगेशला होशात होता ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले तर दुसरीकडे ट्रेलर चालक व क्लीनर हे दोघेही नदीत कुदून जखमी झाले होते त्यांना स्थानिकांनी रुग्णालयात हलविले त्यांच्यावर उपचार सुरु आहे.