“आपली बस” वाहकांना नियमांनुसार महागाई भत्ता घ्यावा – आ. प्रवीण दटके

नागपूर :- नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाद्वारे संचालित “आपली बस” मध्ये कार्यरत वाहकांना बस चालकांप्रमाणे नियमांनुसार महागाई भत्ता आणि इतर सुविधा देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली.

नागपूर महानगरपालिकेतील आयुक्त सभा कक्षात “आपली बस” संदर्भात आमदार प्रवीण दटके यांनी आढावा घेतला. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मनपा परिवहन विभाग प्रमुख गणेश राठोड, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, माजी नगरसेवक नागेश सहारे, आपली बस संघटनेचे सचिव कमलेश वानखेडे, सुमित चिमोटे,निलेश पौनिकर,संदेश डोगरे, प्रवीण काटोले, प्रवीण नरवने, संजय कळसकर, विक्की चौधरी, इसलाउद्दिन फैजी, सोमेश्वर गुगल, आदी उपस्थित होते.

बैठकीत आमदार प्रवीण दटके यांनी आपली बस चालक आणि वाहक यांच्यासह कर्मचाऱ्यांना २०१५चा अध्यादेश लागू करून त्या नुसार पगार व महागाई भत्ता देण्यात यावा, बस वाहक यांचे ८ तासांच्यावर काम झाल्यास नियमानुसार भत्ते देण्यात यावे, जर एखाद्या कर्मचाऱ्यांवर चौकशी करायची असल्यास “निष्पक्षपाती चौकशी अधिकारी” नेमून त्यामार्फत चौकशी करण्यात यावी, आदी मागणी केली. मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त भाजपातर्फे अभिवादन

Fri Jul 19 , 2024
नागपूर :- अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य भाजपतर्फे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मार्गदर्शन करत संवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी इंद्रजीत वासनिक, किशोर बेहाडे, संजय कठाले, नितीन वाघमारे, बंटी पैसाडेली, शंकरराव वानखेडे, भारती, सुनील शीरसाट, संस्थेचे पदाधिकारी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com