नागपूर – आज गाडगे महाराजांची पुण्यतिथी आम आदमी पार्टी नागपूर यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरंजली देण्यात आली. हा कार्यक्रम राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने नागपूर सचिव भूषण ढाकूलकर, विदर्भ युवा संयोजक पियुष आकरे, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, मध्य नागपूर संघटन मंत्री अग्रवाल, नागपूर युवा उपाध्यक्ष गौतम कावरे, दक्षिण-पश्चिम उपाध्यक्ष पुष्पा डाबरे, चमन बनबमनेले, मुन्ना शर्मा, ओम रेकर, टीना शेंडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांनी समानतावादी समाज बनविन्या करीत पूर्ण आयुष्यभर अथक परिश्रम केले. समाजातून अंधश्रद्धा निर्मूलन व्हावी यासाठी विदर्भातल्या गावा-गावात जाऊन त्यांनी लोक जागर केला. गाडगे बाबा यांनी समाजातल्या विविध विकृती निर्मूलन करण्या करिता पूर्ण विदर्भात लोकचेतना जगवण्याचे काम केले. संत गाडगे महाराजनकड़ू प्रेरणा घेवून आम आदमी पार्टी झाडू निवडणूक चिंन्ह घेऊन समाजातील व राजकारणा माधिल विकृति साफ करणार असा निर्धार केला आहे.