आम आदमी पार्टी पक्षाची नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढण्याची घोषणा

नागपूर :- आम आदमी पार्टी (आप) ने ३ ऑगष्ट रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली पत्रपरिषदेत भूषण ढाकुलकर महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री डॉ. शाहिद अली जाफरी महाराष्ट्र प्रदेश सचिव, सोनू बाळूजी फटिंग महाराष्ट्र प्रदेश सचिव, सुनील दादा वडसकर प्रदेश नेते, अजिंक्य कळंबे नागपूर शहर अध्यक्ष, वृषभ वानखेडे नागपूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष त्यांनी आगामी निवडणुकीत जनतेच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार करण्याचे आश्वासन दिले. आपला प्रचार कार्यक्रम पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित असेल: बेरोजगारी: राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी आप ठोस योजना आणि उपाययोजना सादर करणार आहे. तरुणांच्या रोजगाराच्या संधी वाढवणे हे आपले प्राथमिक लक्ष्य असेल. शिक्षण: शिक्षण क्षेत्रात दिल्ली आणि पंजाब च्या धर्तीवर गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आप विविध योजना आणणार आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षणाची हमी देणारी प्रणाली तयार करण्याचा आपचा निर्धार आहे.

आरोग्य: राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी आप विशेष योजना घेऊन येणार आहे. सर्वसामान्य जनतेला मोफत आणि चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमीभाव: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आप शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपचे वचन आहे.200 युनिट वीज मोफत : राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब प्रमाणे महाराष्ट्रात 200 युनिट मोफत करणार. महाराष्ट्राची ढासळलेली संस्कृती: आपल्या राजकीय स्वार्थासाठी जाती जाती होते तीळ निर्माण करू सत्ताधारी पक्ष हे नुसते राजकारण करत आहे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला ठेस पोहोचण्याचा काम करत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आप विशेष प्रयत्न करणार आहे. हार्दिक संविधानाने चालतो आणि संविधानाने सर्वांना समान संधी दिलेली आहे जातीसाठी मधील तेढ हे राज्याला घातक आहे आणि राज्याची संस्कृती आहे की सर्व लोकाभिमुख शासन आपच धोरण आहे राज्य सरकार आल्यावर राज्यातील जनतेला एकत्रित आणण्यासाठी जे राज्याचे वैभव आहे एक सांस्कृतिक वैभव जपण्याचा काम आम आदमी पार्टी करेल .

आम आदमी पार्टीचा असा विश्वास आहे की या मुद्द्यांवर केंद्रित राहून आणि जनतेच्या अपेक्षांवर उतरण्याचे वचन देऊन आपण नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात स्थान निर्माण करू शकतो. आपचे उमेदवार स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जातील. काटोल विधानसभेसाठी जिल्हाध्यक्ष ऋषभ वानखेडे यांना आम आदमी पार्टीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. “महाराष्ट्रातील 288 जागा पूर्ण ताकदीनिशी आणि तयारीनिशी आम आदमी पार्टी लढणार आणि नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा जागा पूर्ण शक्तीनिशी आम आदमी पार्टी जनतेच्या हितासाठी लढणार आणि निवडून आलेले प्रतिनिधी नागपूर जिल्ह्याला योग्य न्याय आणि महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीची सरकार बनवण्यास मदत करणार” असे भूषण ढाकूळकर संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी यांनी म्हटले.परिषदेत आपच्या नेत्यांनी नागपूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले की, त्यांनी आगामी निवडणुकीत आपला मतदान हक्क बजावून आपल्या उमेदवारांना निवडून द्यावे, ज्यामुळे एक आदर्श व जनहितकारी सरकार स्थापन होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ताजाबाद में मौलाना अमीनुल कादरी की तक़रीर आज, देश भर से शामिल होंगे मुस्लिम धर्मगुरु 

Sun Aug 4 , 2024
नागपुर :- बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह के १०२वें उर्स का सिलसिला जारी है. यहां रोजाना ही धार्मिक कार्यक्रम आयोजित किये जा रहे है. रविवार 4 अगस्त को ताजबाग दरगाह पारी में बनाये गए सालाना उर्स के डॉम में हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की जानिब से विश्व प्रसीद्ध इस्लामिक धर्मगुरु मौलाना सैयद अमीनुल कादरी की तक़रीर का भव्य आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com