नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 85 हजार 690 नोंदणीकृत लाभार्थ्यांना 15 डिसेंबर, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करणार असल्याने सर्व लाभार्थ्याची बँक खाती तत्काळ आधार संलग्न करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत ज्या नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांची बँक खाते आधार संलग्न (NPCI Seeded) केलेली नाहीत, त्यांनी तत्काळ आधार संलग्न करावीत. जेणे करून योजनेचा मिळणारा लाभ त्यांना पूर्ववत मिळत राहील.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 1 लाख 85 हजार 690 नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी 1 लाख 55 हजार 151 लाभार्थ्याचा डाटा पी.एम.किसान पोर्टलवर NPCI शी आधार लिंक असून उर्वरित 30 हजार 249 लाभार्थ्याचा डाटा NPCI शी आधार लिक नाही. ज्या लाभार्थ्याचा डाटा NPCI शी आधार लिंक नसेल, अशा लाभार्थ्यांना हप्ते अदा होणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.