कन्हान :- प्रेरिकशन ड्रॉवल मौजा टेकाडी परिसराती ल नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा लगत च्या तार कंपनी मध्ये कामकरणा-या मानव भालेकर हा युवक केमिकल च्या टाक्यात पडुन जळाल्याने त्याचा सात दिवसानी उपचारा दरम्यान मुत्यु झाला.
प्रेरिकशन ड्रॉवल मौजा टेकाडी परिसरात तार कंपनी असुन शनिवार (दि.११) जानेवारी २०२५ ला दुपारी ३ वाजता मानव केवलराम भालेकर राह. पटेल नगर (सत्रापुर टोली) कन्हान वय २२ वर्षीय युवक बॉयलर जवळ काम करित असताना शिडी वरून घस रून तेजाब चा टाकीत पडल्याने भयंकर जळाल्याने त्याला उपचारासाठी प्रथम कामठी येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले परंतु गंभीर जख्मी असल्या ने नागपुर येथील खाजगी ऑरेंज सिटी रूग्णालयात दाखल केले.
डॉक्टर च्या नुसार मानव च्या माने पासुन खाली पर्यत संपूर्ण भाग म्हणजे ८०% जळला होता. आज सात दिवसानी शनिवार (दि.१८) ला पहाटे सकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मानव हा घरातील करता धरता मुलगा असल्याने त्याच्या आई व एक म्हातारी आजी असलेल्या परिवारावर मोठे दु:खाचे संकट ओढवल्याने प्रेरिकशन ड्रॉवल (तार कंपनी) टेकाडी च्या मालकाने त्याच्या परिवारास न्यायोचित आर्थिक मदत करण्याची मागणी त्याचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. या कंपनीत बॉयलर जोखीम चे काम येथील कामगार करित असुन मानव भालेकर ला कसलेही प्रशिक्षण दिले नव्हते व त्याला पाहिजे तश्या सुरक्षेच्या सोयी सुविधा नसल्याने मानव या युवकाचा मुत्यु झाल्याचे बोलल्या जात आहे. तसेच प्राप्त माहिती नुसार कोणतीही पोलीस स्टेशन ला तक्रार नोद झाली नाही.