संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी व कामठी च्या सैन्य विभागातील एपीएस विभागातील स्वयंपाकी म्हणून नोकरीवर असलेल्या विवाहित तरुणाचा मध्यप्रदेशच्या शिवणी येथे गतरात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव विश्वजित धमगाये वय 25 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.आत्महत्येचे कारण कळू शकले नसून या आत्महत्येची सर्वत्र चर्चा रंगत आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवणी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.सदर मृतकाच्या पाठीमागे आई ,वडील ,पत्नी व एक दीड वर्षाची मुलगी आहे तसेच कुटूंबात एकुलता एक मूलगा होता.