नागपूर येथे शनिवारी होणार ‘न्यूज पोर्टल आणि त्याविषयीचे कायदे’ कार्यशाळा

नागपूर : डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने दिनांक : शनिवार, 7 जानेवारी 2023 रोजी नागपुरात प्रथमच डिजिटल मीडियासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत चालणारी ही कार्यशाळा वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेश पांडे (संपादक, तरूण भारत डिजिटल) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ॲड. फिरदोस मिर्झा राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ई. झेड. खोब्रागडे (निवृत्त सनदी अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा),प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर, विनायक देशपांडे, (कुलगुरू, जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती), डॉ. विकास पाठक, (माजी प्राध्यापक, एशियन स्कूल ऑफ जर्नलिझम), ॲड. आनंद देशपांडे, (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), डॉ. कल्याण कुमार यांची उपस्थिती राहील.

या कार्यशाळेमध्ये डिजिटल मीडिया आणि न्यूज पोर्टल संदर्भातील केंद्राने केलेल्या कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती, न्यूज पोर्टल नोंदणीची प्रक्रिया, डिजिटल मीडियातील नव्या संधी आणि फेक न्युज रोखण्यासाठी उपाय, माध्यमे आणि प्रमाण भाषा यावर माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी कायद्यातील विविध तज्ञ, डिजिटल मीडियातील तज्ञ आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. समारोपीय सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यशाळेत राज्यभरातील ४० डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी सहभागी होत आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न- शेखर मांडे

Sat Jan 7 , 2023
नागपूरमध्ये तयार होणार निर्माल्यापासून अत्तर, अगरबत्त्ती नागपूर :- कार्बन उत्सर्जन ही मानवापुढील मोठी समस्या आहे. सन 2070 पर्यंत टप्प्या टप्प्याने कार्बन उत्सर्जन हे शून्यावर आणण्यासाठी भारताने शर्थीचे प्रयत्न सुरु केले असून देशात आगामी सर्व वैज्ञानिक व औद्योगिक धोरणांमध्ये ह्याच बाबीवर भर देण्यात आला आहे, असे सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तसेच निर्माल्यापासून अत्तर, अगरबत्त्ती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com