बखारी शेतात वीज पडुन एक महिला मृत तर सात मजुर जख्मी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

चार मजुर महिलेचा आयसीओ मध्ये तर १ पुरूष व १ महिलेचा जनरल वार्डात उपचार सुरू.

कन्हान : – पासुन उत्तरेस १५ किमी लांब पेंच नदी काठावरील बखारी (पिपळा) येथे शेतात कपाशी च्या बियाची (सरकीची) लावण करित असताना दुपारी वादळ वा-यासह शेतात अचानक वीज पडल्याने सरकी लावणा-या एका महिलेचा घटनास्थळीच मुत्यु झाला. तर दोन पुरूष व सहा महिला असे आठ मजुर जख्मी झाले.
बखारी येथील शेतकरी चंद्रभान गोंडाणे हयानी श्री पदमाकर गोपाळरावजी पांडे यांचे शेत वाहण्या करिता ठेक्याने करून सोमवार (दि.२०) जुन ला सका ळी शेतात मजुरासह जाऊन कपासी च्या बियाण्याची (सरकीची) लावण करण्यास सुरूवात केली. दुपारी ३.३० वाजता दरम्यान वादळ वारा येऊन अचानक जोराच्या कडाक्यासह लावणीच्या शेतात वीज पडल्या ने सरकी लावणारे दोन पुरूष व सहा महिला जख्मी झाले. त्याना तातडीने उपचाराकरिता गावातील ओम नी चार चाकी वाहनाने कन्हान च्या खाजगी वानखेडे दवाखाण्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन मायाबाई कैलास केवट वय ४५ वर्ष राह बखारी यांचा घटना स्थळीच मुत्यु झाल्याचे घोषित केल्याने कामठी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदना करिता मुतदेह पाठविण्यात आला. तर १) मिराबाई चंद्रभान गोंडाणे वय ४४ वर्ष, २) प्रभावती ईश्वर भिमटे वय ५२ वर्ष, ३) यमुनाबाई मनोहर केवट वय ४६ वर्ष, ४) बाली सुरेश गोंडाणे वय ३५ वर्ष सर्व राह. बखारी याची प्रकृती चिंताजनक असल्याने आयसीओ मध्ये उपचार कर ण्यात येत आहे. व १) वर्षा सुरेश गोंडाणे २) दुर्गेश मनोहर केवट वय १८ वर्ष दोन्ही राह. बखारी यांचा जनरल वार्डात उपचार सुरू आहे. आणि नामदेव बाझनघाटे वय ६५ वर्ष राह. बखारी यांच्या छाती मध्ये थोडे दुखने असल्याने औषधोपचार करून घरी नेण्या त आले. घटनेची माहीती मिळताच ग्रा प बखारी सरपंच नरेश ढोणे हयानी जख्मीना खाजगी वाहनाने कन्हान येथे उपचाराकरिता नेले. मंडळ अधिकारी बी जी जगदाळे, तलाठी शितल गौर, कोतवाल सेवक भोंडे हयानी घटनास्थळी व दवाखान्यात भेट देऊन घटनेचा अहवाल तयार करून तहसिलदार पारशिवनी हया पाठविला. बखारी गाव शेतशिवारात अचानक शेतात विज पडल्याने सरकी लावणा-या एका महिलेचा धटना स्थळीच मुत्यु झाला तर दोन पुरूष व पाच महिला मजुर जख्मी झाल्याने या मजुरांच्या कुंटुबाना शासना ने तातडीने आर्थिक साहायता करण्यात यावी. अशी मागणी ग्रा प सरपंच नरेश ढोणे, शेतकरी रविंद्र चौधरी सह ग्रामस्थ शेतक-यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगर परिषद कार्यालयात जागतिक योग दिन साजरा

Tue Jun 21 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 21:-योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित , सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक व स्वस्थ तरुण घडविण्यास तसेच योगाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत व्हावी या मुख्य उद्देशाने आज 21 जून ला आंतररराष्ट्रीय योग दिनानिमित्त कामठी नगर परिषद च्या वतीने नगर परिषद सभागृहात सामूहिक योग साधना घेण्यात आली. याप्रसंगी कामठी नगर परिषद चे उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण, कर अधीक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com