दोन दुचाकीच्या परस्पर अपघातात एका दुचाकीचालकाचा जागीच मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गावरील बी एन पाटील ढाब्यासमोर दोन दुचाकीच्या परस्पर धडकेत घडलेल्या गंभीर दुचाकी अपघातात एका दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री 8 दरम्यान घडली असून मृतक दुचाकी चालकाचे नाव दिलीप गणपत पारधी वय 54 वर्षे रा बाराद्वारी ,पारडी नागपूर असे आहे. यासंदर्भात मृतकाचा भाऊ फिर्यादी श्रीराम गणपतराव पारधी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी दुचाकी क्र सी जी 25 एल 5761 च्या चालका विरुद्ध भादवी कलम 279,304(अ), 337 भादवी सहकलम 184 मोटर वाहन कायदा अनव्ये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक दुचाकीचालक हा कपड्याच्या दुकानात सेल्समेन म्हणून कार्यरत होता. घटनावेळी सदर मृतक हा आपली पत्नी व मुलासह दुचाकी क्र एम एच 40 ए वाय 2517 ने वलंबा येथून नागपूर जबलपूर हायवेने लिहिगाव मार्गे बी एन ढाब्यासमोरून पारडी कडे येत असता भरधाव वेगाने येणाऱ्या आरोपी वाहनचालकाणे आपल्या ताब्यातील दुचाकी क्र सी जी 25 एल 5761 ने जोरदार धडक दिली ज्यामुळे घडलेल्या दुचाकी अपघातात मृतक दुचाकी चालक जागीच मृत्यू पावला तर त्यासोबत असणारे पत्नी व 20 वर्षोय मुलगा किरकोळ जख्मि झाले.

घटनेची माहिती मिळताच नविन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक विरुद्ध कायदेशिर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आजनी येथे शिवजयंती उत्सव साजरा, रक्तदान शिबिर संपन्न 

Mon Feb 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तालुक्यातील आजनी येथे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा १९ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातून एक फेरी काढल्यानंतर जिजाऊ उद्यान परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करून गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील अनेक मान्यवर तथा शिवप्रेमी उपस्थित होते. प्रियंका घोडे आणि बुंदेले  यांनी शिवगर्जना करून मानवंदना दिली तर मातोश्री योगासन महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!