कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण 804 उमेदवारी अर्ज सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-27 सरपंचपदाच्या निवडीसाठी 120 उमेदवारी अर्ज तर 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 684 उमेदवारी अर्ज सादर

कामठी :-18 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा कालावधीतील 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत 27 सरपंच पदासाठी 120 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले असून 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 684 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. यानुसार एकूण 804 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून निवड होणारे 27 सरपंच व 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. या 27 ग्रामपंचयात निवडणुकीसाठी 34 हजार 674 पुरुष ,33 हजार 509 स्त्री मतदार तसेच 2 तृतीयपंथी मतदार असे एकूण 68 हजार 185 मतदार एकूण 122 मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावनार आहेत .

निवडणूक होणाऱ्या या 27 ग्रामपंचायती मध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प अंतर्गत 6 प्रभाग मिळून 17 सदस्यपदासाठी 54 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले तर सरपंचपदासाठी सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. रणाळा ग्रा प सरपंच पदासाठी सात तर 5 प्रभागातील 13 सदस्यपदासाठी 45 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.खैरी ग्रा प च्या सरपंच पदासाठी सात तर 3 प्रभागातील 9 सदस्यपदासाठी 22 उमेदवार,बिना ग्रा प सरपंचपदासाठी 05 ,तर 4 प्रभागातील 11 सदस्यांसाठी 22 उमेदवार,भिलगाव ग्रा प सरपंच पदासाठी चार उमेदवार तर 05 प्रभागातील 13 सदस्यांसाठी 44 उमेदवार, खसाळा ग्रा प सरपंच पदासाठी सहा उमेदवार तर तीन प्रभाग मिळून 9 सदस्यांसाठी 24 उमेदवार, सुरदेवी ग्रा प सरपंच पदासाठी 6 उमेदवार तर 03 प्रभागातील 9 सदस्य पदासाठी 23 उमेदवार,खापा ग्रा प सरपंच पदासाठी फक्त दोन उमेदवार तर 3 प्रभागातील 9 सदस्यपदासाठी 17 उमेदवार,कढोली ग्रा प सरपंच पदासाठी 5 उमेदवार तर 3 प्रभागातील 9 सदस्य पदासाठी 28 उमेदवार,भोवरी ग्रा प सरपंच पदासाठी 04 उमेदवार ,तर तीन प्रभागातील 7 सदस्य पदासाठी 20 उमेदवार,आजनी ग्रा प सरपंच पदासाठी चार उमेदवार तर 3 प्रभागातील 9 सदस्यपदासाठी 16 उमेदवार,लिहिगाव ग्रा प सरपंच पदासाठी 05 उमेदवार,3 प्रभागातील सदस्यपदासाठी 25 उमेदवार,कापसी (बु) सरपंच पदासाठी फक्त दोन उमेदवार तर 3 प्रभागातील 9 सदस्य पदासाठी 19 उमेदवार,गादा ग्रा प सरपंच पदासाठी 9 उमेदवार तर 3 प्रभागातील 9 सदस्यांसाठी 26 उमेदवार,सोनेगाव ग्रा प सरपंच पदासाठी 05 उमेदवार, तर 3 प्रभागातील 9 सदस्य पदासाठी 18 उमेदवार,गुमथी ग्रा प सरपंच पदासाठी चार उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 17 उमेदवार,आवंढी ग्रा प सरपंच पदासाठी 2 उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 15 उमेदवार, गुमथळा ग्रा प सरपंच पदासाठी 03 उमेदवार तर चार प्रभागातील 11 सदस्य पदासाठी 34 उमेदवार, तरोडी बु सरपंच पदासाठी 3 उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 17 उमेदवार,परसाड ग्रा प सरपंच पदासाठी 03 उमेदवार,3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 15 उमेदवार,जाखेगाव ग्रा प सरपंच पदासाठी चार उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 15 उमेदवार,केम ग्रा प सरपंच पदासाठी तीन उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 16 उमेदवार,दिघोरी ग्रा प सरपंच पदासाठी 2 उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 15 उमेदवार,आडका ग्रा प सरपंच पदासाठी चार उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 22 उमेदवार,शिवणी ग्रा प सरपंच पदासाठी तीन उमेदवार तर 3 प्रभागातील सात सदस्य पदासाठी 14 उमेदवार,भुगाव ग्रा प सरपंच पदासाठी चार उमेदवार,तर चार प्रभागातील 11 सदस्य पदासाठी 36 उमेदवार तसेच वडोदा ग्रा प सरपंच पदासाठी सात उमेदवार तर पाच प्रभागातील 13 सदस्य पदासाठी 65 उमेदवारांनी निवडणूक अधिकारीकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धावत्या रेल्वेगाडीतून खाली पडलेल्या अनोळखी इसमाचा मृत्यु

Sat Dec 3 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या शेवटचे प्लेटफॉर्म लाईन नं 2 जवळ एक अनोळखी इसम धावत्या रेल्वेगाडीतून खाली पडल्याने मृतावस्थेत आढळल्याची घटना 30 नोव्हेंबर च्या रात्री दीड दरम्यान उघडकीस आली असून पोलिसांनी सदर घटनेची नोंद करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले. मृतकाची ओळख अजूनही पटलेली नसून मृतक अनोळखी असून वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com