लोखंडी गेट अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू…!

– कान्द्री-माईन परिसरातील घटना.

– घराच्या अंगणात मित्रांसोबत खेळत होता

रामटेक :- खेळत असताना अचानक अंगणात लावण्यात आलेला लोखंडी गेट एका चिमुकल्याच्या डोक्यावर पडल्याने उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना दिनांक 15 मे ला सकाळी घडली.

प्राप्त माहितीनुसार, तालुका रामटेक अंतर्गत कान्द्री-माईन येथील रहिवासी विशाल मसराम यांचा 3 वर्षाचा मुलगा रोशित विशाल मसराम हा घराजवळील दीपक गणेश कठोते यांच्या घराच्या अंगणात आपल्या 3 मित्रांसोबत खेळत होता.

अंगणातील लोखंडी गेट पूर्णपणे बंदिस्त नसल्याने हा 3 वर्षाचा चिमुकला गेटजवळ गेला असता अचानक त्याच्या अंगावर भलामोठा लोखंडी गेट पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.परिसरातील लोकांनी चिमुकल्याच्या अंगावरील गेट उचलून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र,मनसर येथे नेले.

मात्र डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा प्राथमिक उपचारादरम्यान मृत्यू झाला.चिमुकल्याच्या अशा एकाएकी निघून गेल्याने त्याच्या आई, वडील व कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला - भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

Fri May 17 , 2024
– ओबीसी विरोधी काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल मुंबई :- मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com