अरोली :- माजी जि प उपाध्यक्ष स्वर्गीय ज्ञानेश्वर साठवणे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या खात – रेवराल जि. प , प स रेवराल अंतर्गत येणाऱ्या 56 वर्षाची परंपरा लाभलेल्या मांगली (तेली) येथे उद्या 10 जानेवारी शुक्रवारपासून तीन दिवसीय मंडईला जंगी कुस्त्यांच्या आम दंगलीने दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे.
10 जानेवारी शुक्रवारला रात्री सात वाजता जय बजरंग नाट्य रंगभूमी देसाईगंज (वडसा )प्रस्तुत मी शुक्राची चांदणी लावणी ग्रुप यांच्या लावणीचा कार्यक्रम , 11 जानेवारी शनिवारला सकाळी नऊ वाजता पासून ग्रामपंचायत च्या आवारात क्रांतीज्योती कलंगी मंडळ खंडाळा शाहीर सुरज ब्रह्माजी नवघरे यांच्या राष्ट्रीय संगीत खडा तमाशा, रात्री सात वाजता ग्रामपंचायत पटांगणात सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराज यांची शिष्य कुमारी जानवी सोपान घुमे यांच्या तुफानी विनोदी समाज प्रबोधन पर कीर्तनाच्या कार्यक्रम, 12 जानेवारी दुपारी बारा वाजता रविवारला ग्रामपंचायत समोर भारतीय जनता पार्टीच्या सौजन्याने आकाश कुमार प्रस्तुत एके लावणी डान्स ग्रुप नागपूर यांच्या लावणीच्या कार्यक्रम आयोजित केलेलला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्याम कुमार बर्वे, अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल प्रमुख अतिथी आमदार कृपाल तुमाने माजी अध्यक्ष सुरेश भोयर, आमदार अभिजीत वंजारी ,माजी मंत्री राजेंद्र मुळक ,माजी आमदार टेकचंद सावरकर ,पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर सह गावातील ,परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील ,राज्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,पुढारी ,कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या तीन दिवसीय भरगच्च सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान गट ग्रामपंचायत मांगली (तेली )सरपंचा निशा रवींद्र फटिंग उपसरपंच मोनू कवडू साठवणे ,ग्रामपंचायत सदस्य गण बंडू बुराडे, त्रंबकेश्वर साठवणे, लंकेश डोरले, रोशन मोहतुरे ,शितल पतिराम मेश्राम, पिंकी गोपाल वाघाडे ,प्रीती बकाराम वराडे, माया धनराज उईके , सचिव एस के मोहरे कुमारी इशिका वंजारी, कॅम्पुटर लिपिक गीता सुहास साठवणे ,ग्रामपंचायत कर्मचारी वृंद विलास कुंडलकर ,महेंद्र डोरले सह समस्त ग्रामवासियांनी केले आहे व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक वर्गासह समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.