– नागरिकांनी नोंदणी विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा – भिवगडे
कामठी :- राज्य शासनाने 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह सादर करण्याचे निर्देशित केले आहे त्यानुसार कामठी येथील नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून मिळकतीचे अभिलेख जतन करण्यात विश्वासाचे प्रतीक म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभाग होय. नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे देण्यात येत असलेल्या योजना ,सेवा व सुविधांचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन कामठी चे दुय्यम निबंधक अ.भिवगडे यांनी केले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे कामठी येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयात नागरिकांना संगणकीकृत ऑनलाईन दस्तावेजांची नोंदणी करता येते ,ज्येष्ठ नागरिक ,अपंग ,आजारी व्यक्ती ,गर्भार माता यांच्या दस्तांची प्राधान्याने नोंदणी करता येते तसेच मोबाईल क्र व ई-मेल आय डी नमूद केल्यास दस्तांची माहिती एसएमस व ईमेलद्वारे मिळते, घरबसल्या मिळकतीचा शोध घेण्याची विभागाची वेबसाईटवर ऑनलाईन सुविधा आहे,ऑनलाईन सूची क्र 2 काढण्याची विभागाची वेबसाईटवर सुविधा आहे,घरबसल्या आपल्या मिळकतिचे मूल्यांकन काढण्याची वेबसाईटवर सुविधा आहे,विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा केलेली आहे.
कार्यालयात न येता कर्ज प्रकरणातील नोटीस ऑफ इंटिमेशनची ऑनलाईन सुविधा ,कार्यालयात न येता लिव्ह अँड लायसन्सचे ऑनलाईन फायलिंग करण्याची सुविधा, कार्यालयात प्रतीक्षा न करण्यासाठी टोकन बुकिंग सुविधा, सलोखा योजनेत मुद्रांक शुल्क माफी एक हजार रुपयाच्या मुद्रांकावर दस्त नोंदणी,महिला खरेदीदारांना निवासी मिळकतीसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्केची सवलत,विद्यार्थी यांच्या करिता शैक्षणिक कर्जाचे गहाणखतास मुद्रांक शुल्कातुन पूर्ण माफी,विद्यार्थी करिता शपथपत्रास मुद्रांक शुल्कातुन पूर्ण माफी,प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केवळ 1 हजार रुपये मुद्रांकावर दस्त नोंदणी ,नवीन उद्योगासाठीचे प्रथम दस्तास मुद्रांक शुल्कातुन पूर्ण माफी,जलद, तत्पर ,सुलभ व विश्ववसनीय सेवा देऊन जनतेच्या अभिलेखाचे जतन करण्यात येत आहे.तेव्हा नागरिकांनी या योजना ,सेवा,सुविधा चा लाभ घ्यावा असे आवाहन दुय्यम निबंधक अ. भिवगडे यांनी केले आहे.