संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– भाडंण सोडविताना आईला मुलाच्या हातुन बंदुकीची गोळी लागुन आई जख्मी
– मुलगा सुनिल तिवारी अटक, दोन बंदुक, एक चाकु जप्त.
कन्हान :- कांद्री येथील वार्ड क्र.४ येथील सुनिल तिवारी यांचे घरी नितीन केशरवानी हा सोबत दोघाना घेऊन पैसे मागण्यास गेेले असता आर्थिक व्यवहारा तुन वाद विकोपाला गेल्याने सुनिल ची आई शोभा तिवारी या भाडंण सोडविण्यास गेली असता सुनिल च्या हातातील बंदुकीची गोळी चालुन मधे आलेल्या आई शोभाच्या हाताला लागुन गंभीर जख्मी झाल्याने पोलीसानी जख्मी शोभा तिवारी ला उपचाराथ दाखल करून मुलगा सुनिल तिवारी यास अटक करून दोन बंदुक, एक चाकु जप्त करित पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
गुरूवार (दि.२८) मार्च २०२४ ला सकाळी ९.३० वाजता दरम्यान जे एन दवाखाना कांद्री जय दुर्गा मंगल कार्यालयाच्या जवळपास वार्ड क्र.४ येथे सुनिल तिवारी घरी असताना नितीन केशरवानी हा सोबत दोघाना घेऊन पैसे मागण्यास गेेले असता सुनिल च्या घरासामोर रस्त्यावर आर्थिक व्यवहारातुन भांडण होऊन वाद विकोपाला गेल्याने सुनिल ची आई शोभा तिवारी ही भाडंण सोडविण्यास गेली असता सुनिलच्या हातातील बंदुकीची गोळी चालुन मधे आले ल्या आई शोभाच्या हाताला लागुन गंभीर जख्मी झाल्याची माहिती कन्हान पोलीसानी मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार उमेश पाटील, एपीआय प्रराग फुलझेले पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी पोहचुन जख्मी शोभा तिवारीला कामठी येथील खाजगी रूग्णालयात उपचाराथ दाखल करण्यात आले असुन पसार झालेल्या मुलगा सुनिल तिवारी यास क पोलीसानी अटक करून दोन बंदुक, एक चाकु जप्त करून कन्हान पोलीस कार्यवाई करित असताना हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, उपिभागिय अधिकारी संतोष गायकवाड, ओमप्रकाश कोकाटे पोनि स्थागुअ शाखा नागपुर हयानी तपास यंत्राने सह घटनास्थळाला भेट देऊन योग कारवाई चे निर्देश देण्यात आले आहे. बातमी लिहे पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला सदर गुन्हा दाखल होत होता.