– भोसला मिलिटरी स्कूलच्या वार्षिक महोत्सवाला उपस्थिती*
नागपूर :- देशाची खरी शक्ती युवा पिढी आहे . सशक्त व समर्थ युवा पिढी हीच देशाची खरी संपत्ती आहे. देश निर्मितीमध्ये युवा पिढीचा महत्त्वाचा वाटा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भोसला मिलिटरी स्कूलच्या कस्तुरचंद पार्क येथे झालेल्या वार्षिक महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित होती. यावेळी ते बोलत होते.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कर्नल अमरेंद्र हरदास (निवृत्त), पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी यावेळी उपस्थित आहेत.
पहिल्या दिवसापासून भोसला मिलिटरी स्कूलशी नाते आहे. या स्कूलला वेगाने विकसित होताना जवळून पाहिले आहे. या स्कूलची देदीप्यमान प्रगती वाखानण्याजोगी आहे. संस्थापक बी. एस. मुंजे यांनी देशभक्त युवा पिढी तयार व्हावी यासाठी या स्कूलची निर्मिती केली असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या काही वर्षात देशाने वेगाने प्रगती केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताचे सृजन पाहिले जात आहे व ते पूर्णत्वास येत आहे. यात युवा पिढीची महत्त्वाची भूमिका आहे. देशाचे सैन्यदल आत्मनिर्भर होत असून पुर्वी शस्त्रास्त्रे आयात केली जायची. आता मात्र मोठ्या प्रमाणात देशाची निर्यात वाढली आहे. मुलींसाठी स्वतंत्र मिलिटरी स्कूलची निर्मिती करण्याचा संस्थेचा मानस कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
तत्पूर्वी, एआरओ मॉडेलिंग, विविध जिमनॅस्टिक प्रकार, घोडेस्वारी यांचे सादरीकरण विद्यार्थ्यामार्फत उपस्थितांसमोर करण्यात आले.
भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक बी. एस. मुंजे यांच्या जीवनावर आधारित धनश्री हरदास यांनी भाषांतरित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.