संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी नगर परिषद ने मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा
कामठी :- शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा हैदोस असून त्यातील काही कुत्री संसर्गजन्य रोगाने ग्रासलेले असल्याने ती कुत्री सरळ लहान बालकांसह मोठ्यांना चावा घेत आहेत. नुकतेच सोमवारी एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने बोरियापुरा येथील एका लहान बालकाला चावा घेतला तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे कार्यरत अश्विन चहांदे नामक पोलीस कर्मचाऱ्याचा चावा घेतला तर त्याच दिवशी जवळपास सात लोकांना चावा घेतला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून हे मोकाट कुत्रे जीवघेणा हल्ला करीत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. नुकत्याच आमंदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनसंवाद बैठकीत मोकाट कुत्रे व डूकरावर नियंत्रण साधण्यात नगर परिषद प्रशासन अकार्यक्षम असल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता यावेळी पशु संवर्धन अधिकारी व मुख्याधिकारी एक दुसऱ्याकडे बोट दाखवत होते तर राज्य शासनाने मोकाट कुत्र्यावर नसबंदी करून त्यावर नियंत्रण साधण्यासाठी 17 कोटी रुपये मंजूर केले आहेत ज्यामध्ये वाडी व कामठी नगर परिषदचा सुद्धा समावेश आहे. मात्र येथील नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे तर हे मोकाट कुत्रे नागरिकांवर जीवघेणे हल्ले करीत आहेत त्यामुळे अशा कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची जवाबदारी कामठी नगर परोषद ने घेत मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी शहरवासीयांनी केली आहे.
कामठी शहरात दोन हजार च्या जवळपास मोकाट कुत्रे असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे ज्या नागरिकांकडे पाळीव कुत्रे आहेत त्या कुत्र्यांनाही मोकाट कुत्र्यांचा सहवास होत असल्याने खरूज सारखे संसर्गजन्य रोग त्यांनाही जडत आहेत ज्यामुळे परिणामी ही मोकाट कुत्रे दिसेल त्यांना चावा घेतात त्यांमुळे नागरिक अशा मोकाट कुत्र्यामुळे त्रस्त झाले आहेत.
कामठी नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून या संस्थेने शहरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे .कुत्रा चावला की विविध भीतीमय चर्चाना वेग येतो कारण कुत्रा चावल्यामुळे झालेल्या विपरीत परिणामा मुळे काही वर्षांपूर्वी मोंढा येथील एक बालक दगावला तसेच नुकतेच काही वर्षांपूर्वी रविदास नगर येथील कुरील कुटुंबियातील तरुण मुलगा मृत्युमुखी पडला आहे .तसेच मागील वर्षी कामठी नगर परिषद चा सेवानिवृत्त कर्मचारी खुशाल सपाटे हे कुत्रा चावल्याने मरण पावले अशा परिस्थितीत कुत्रा चावल्याची बाब गांभीर्याने घेत अकाली मृत्यूपासून बचाव करण्याहेतु मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांना पकड मोहीम राबवून शहराबाहेर पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे.
कुत्रा चावल्यानंतर रेबीज चे इंजेक्शन नेहमीच शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असतात असे म्हणता येत नाही त्यातही रेबीज चे एक महत्त्वपूर्ण व दुर्मिळ असलेली इंजेक्शन सहसा शास्कोय उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होत नाही परिणामी ही इंजेक्शन नाईलाजाने पैसे मोजून विकत घ्यावे लागते अशा वेळी या इंजेक्शन लावण्याला डॉक्टर धजावत असून विशेषता शासकीय रुग्णालयातच हलविले जातात ज्यामुळे बहुधा कुत्रा चावलेलयांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले जाते.
वास्तविकता हमालपुरा परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस पसरला असून या कुत्र्यांनी कित्येकदा लहान लेकरासह इतरांचा चावा घेतला आहे ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत एकीकडे पशूंना मारण्यावर बंदी घातली आहे त्यामुळे कोणत्याही कुत्र्याला मारले किंवा जख्मि केले तर त्या विरुद्ध पशु सँरक्षण कायदा अमलात आणल्या जातो वेळप्रसंगी अशा प्रकरणात हमालपुरा वासीयांचा कुत्रा चावल्याची प्रकरणे पोलीस स्टेशन ला सुद्धा पोहोचले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कुत्र्याला मारण्यासाठी धजावत नसले तरी शहरातील पासीपुरा मैदान, जयभीम चौक, रविदास नगर, हमालपुरा यासारख्या अनेक परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस पसरला असून नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे तेव्हा नगर परिषद ने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.