संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सदस्य सचिव पदाची जबाबदारी काढण्याच्या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने दिलेले निवेदन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटकर यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ही महिला बालकल्याण विकास विभाग महाराष्ट्र शासन मार्फत करण्यात चा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे योजनेची अंमलबजावणी साठी तालुकास्तरीय समितीमध्ये तहसीलदार सदस्य सचिव करून पूर्ण जबाबदारी महसूल विभागावर टाकण्यात आली आहे सदर योजनेची अंमलबजावणी महिला बालकल्याण विकास विभागामार्फ होणे आवश्यक आहे यापूर्वीच महसूल विभागावर मोठा कामाचा व्याप ,पुनर्नरीक्षण कार्यक्रम, विधानसभा निवडणूक तयारी ,नैसर्गिक आपत्ती पंचनामे ,बांधीत शेतकरी केवायसी करणे ,संजय गांधी निराधार अनुदान ,पुरवठा शिधापत्रिका ,ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम ,अपुरे मनुष्यबळ , विविध प्रकारचे फार मोठी कामे महसूल विभागाकडे आहे त्यामुळे तहसीलदार सतत कामात व्यस्त असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला बालकल्याण विभागाची असून सचिव पदाची जबाबदारी ही महिला बाल कल्याण विभाग विकास अधिकाऱ्याकडेच देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे सदर मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना देतेवेळी कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे,मौदा चे तहसीलदार धनंजय देशमुख ,काटोलचे तहसीलदार राजू रणवीर, रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे , कुहीचे तहसीलदार शरद कांबळे, हिंगण्याचे तहसीलदार सचिन कुमावत,नायब तहसीलदार अंबादे यासह 13 ही तालुक्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.