नागपूर :-बुधवार ला जिल्हाधिकारी कार्यालयात गोंडवाना गणतंत्र पार्टी, युवा मोर्चा, गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ठ यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गोंडराजे रावण यांचा पुतळा जाळणे आणि विभारत व्यवस्थेवर आणि विशीष्ट मूलनिवासी आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे, अपमान करने आणि अत्याचार करणे या दृष्ट प्रथावर प्रतिबंध लावण्यासाठी निवेदन देण्यात आले. माहात्मा राजा रावण हे आदिवासी समाजाचे पुज्यनिय आणि व अत्यंत समृध्द संस्कृतीचा वैभवशाली वारस्याच्या अविस्मरणीय ठेवा आहे. महात्मा राजा रावण विविध गुणांचा समुच्चय आहे. महान दार्शनिक, संगित, तज्ञ, राजनितीज्ञ, शिल्पकार, नितीतज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट रचनाकार, समताधिष्टीत समाज व्यवस्थेचा उदगाता, न्यायप्रिय राजा अशा अनेक गुणांचा अविष्कार करणारा राजा होता. अशा महान राजाला इथल्या षडयंत्रकारी वर्णाध व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसुर ठेवली नाही. वास्तविक पाहता राजा रावणासारखा महापराक्रमी योध्दा झाला नाही व यापुढे होणार ही नाही. तामिळनाडू मध्ये माहात्मा राजा रावण यांची 352 मंदीरे आहेत. सर्वात मोठी मुर्ती ही मध्यप्रदेशातील मंदसौर येथे अंदाजे 15 मिटर उंचीची आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, झारखंड येथे महात्मा राजा रावण यांची पुजा केली जाते. माहात्मा रावण हे आदिम संस्कृतीचे श्रध्दास्थान व दैवत आहे. परंतु आदिवासींच्या या समताधिष्टीत साज व्यवस्थेचा उदगाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात म्हणून माहात्मा राजा रावण यांच्या पुतळ्याच्या दहन करण्याची परवानगी देऊ नये. शासन स्तरावर या प्रथांना बंद करण्यात यावे.
यावेळी दिनेश सिडाम अध्यक्ष नागपूर शहर गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी उद्देशुन म्हटले विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला तर सर्व आदिवासी संघटना तर्फे तीव्र स्वरुपात जाहीर निषेध करण्यात येईल. आमच्या न्याय प्रिय राजाचा अपमान करतील तर अनुसुचित जाती / जमाती प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता 1960 अंतर्गत 153,153 (अ) 295, 298, मुबंई पोलीस Act 131, 134, 135 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आदिवासी समाजाच्या माहात्मा राजा रावण यांची जागृकता निर्माण होत आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये.अन्यथा गोंडवाना गणतंत्र पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ठ व आदिवासी समाज भविष्यात उग्र जनआंदोलन करेल याची दखल घ्यावी. व याला जवाबदार प्रशासन राहील यावेळी दिनेश सिडाम शहर अध्यक्ष, गंगाताई टेकाम अध्यक्षा नागपूर जिल्हा, शिला मरसकोल्हे अध्यक्ष नागपूर शहर शितल मडावी सचिव नागपूर शहर मिना कोकुर्डे वार्ड अध्यक्ष उमा सरोते सामाजिक कार्यकर्ता राकेश उईके वार्ड अध्यक्ष कुभांरटोली, धिरज मसराम वार्ड अध्यक्ष धंतोली, कृष्णा सरोटे उपाध्यक्ष नागपूर शहर अशोक पोयाम, ज्ञानेश्वर कुभंरे, राजु श्रीरामे उपस्थित होते.