नागपूर :-नागपूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे मालकी हक्काचे पट्टे वाटप च्या संदर्भात नागपूर महानगर झोपडपट्टी मोर्चा च्या वतीने आज दिनांक 11 एप्रिल ला शहर अध्यक्ष भरी परशु ठाकुर यांच्या नेतृत्वात नागपूर शहर जिल्हाधिकारी यांना भेटून झोपडपट्टी विषयी चर्चा करण्यात आली. तसेच नजुल ,झुडपी जंगल, आणि खाजगी जागेवरील झोपडपट्ट्यांचे मालकी हक्काचे पट्टे संदर्भात शासनाचे कार्य कुठपर्यंत आलेले आहेत तसेच सर्व विधानसभा नुसार झोपडपट्टी चे पट्टेवाटप ची माहिती मागण्यात आली. मागितलेली सर्व माहिती येत्या तीन ते चार दिवसात शहर अध्यक्ष परशु ठाकूर यांना पोहोचती करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बिपिन इटनकर यांनी दिले. यावेळी नगर महामंत्री निळकंठ आबाडरे, श्याम थोरात, चेतन डोमडे, दक्षिण पश्चिम अध्यक्ष रमेश काळमेघ, पूर्व अध्यक्ष सुनील आगरे, दक्षिण महामंत्री उषा झांबरे, शहर संपर्कप्रमुख ललित साहू सह झोपडपट्टी मोर्चाच्या नगर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा नागपूर महानगर झोपडपट्टी मोर्चा यांच्या वतीने नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com