नागपूर :- दिनांक 0६/0७/२०२३ रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी नागपुर यांना ‘आपले सरकार सेवा केंन्द्र” चे योग्य पध्दतीने वाटप करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे जनसामान्य हितासाठी तसेच नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय किवा तहसील कार्यालयात न जाता शासकीय प्रमाणपत्रे उपाब्ध व्हावी यासाठी ‘आपले सरकार सेवा केंन्द्र’ उघडण्यात आले.परंतु याचे वाटप अयोग्य पध्दतीने होत असल्यामुळे अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे मा.जिल्हाधिकारी यांनी योग्य चौकशी करून आपले सरकार सेवा केंद्र वाटप करावे हे निवेदन करण्यात आले या प्रसंगी निखिल जाजुलवार, राजु दळवी, मनोज कुमेरिया, अतुल माने,क्रांती ढोक यांची उपस्थित होते मा.जिल्हाधिकार्यांनी याच्यावर योग्य चौकशी करून शाहनिशाकरून योग्य वैक्तिंना वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले.