संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- ग्राम पंचायत टेकाडी (कोळसा खदान) हद्दीत बस स्टॉप ला लागुन टेकाडी गावाच्या रस्त्यावर नविन मद्यपान विक्री दुकानाचा परवाना दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने गावक-यांनी आक्रमक होत ग्रा पं कार्यालयात धाव घेऊन परवानगी देणा-या त्या वेळच्या सरपंच व सचिवावर तिव्र रौष व्यकत करित चांगलीच घोषणाबाजी केली. सध्या कार्यरत सरपंच, पदाधिकारी व सचिवानी तात्काल विशेष आमसभा घेऊन या नविन मध्यपान विक्री दुकानाचा परवाना रद्द करावा. अशी मागणी निवेदनाने करण्यात आली.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी बस स्टाप वरून गावात जाणा-या गाव रस्त्यावर नविन मध्यपान विक्री दुकान परवाना मागिल पदस्थ सरपंच व सचिवानी दिल्याने मध्य विक्री दुकान सुरू होण्याची माहिती वा-या सारखी पसरल्याने गावक-यांचा पारा चढला कारण जिथे मद्यपान विक्रीची परवानगी मिळाली ही टेकाडी बस स्टाप ते गावास जाणारा रस्ता असुन गावातील महिला, पुरूष व शिक्षण घेणा-या मुली, मुले ये-जा करित असतात, त्या जागेच्या अर्ध्या किमी च्या आत साईबाबा आदिवासी आश्रम शाळा, श्रीराम मंदिर , हनुमान मंदिर, दुर्गा मंदीर, साई मंदिर, गुरुद्वारा आदी धार्मिक व शैक्षणिक स्थळाचा विचार न करता सुद्धा परवानगी दिली कशी ? यावरून गावकरी चांगलेच संतप्त होऊन येथील राजकिय नेत्याच्या पुढाकाराने कन्हान, कांद्रीत १३ विदेशी व ६ देशी दारूचे टुकान उघडुन वातावरण जसे नासवले तसेच टेकाडी गाव खराब करण्यास सुरू करित तर नाही ना ? यामुळे हा परवाना मिळवुन देणा-या बड्या नेत्या व मध्यपान विक्री परवाना घेणाऱ्या मालका विरूध्द ग्रामस्थानी तीव्र रोष व्यकत करून सध्या स्थित कार्यरत सरपंच, पदाधिकारी व सचिवानी तात्काल विशेष आमसभा घेऊन या नविन मध्यपान विक्री दुकानाचा परवाना रद्द करावा. अशी मागणी ग्रा प टेकाडी (को.ख) ला निवेदन देऊन करण्यात आली. याप्रसंगी नंदू लेकुरवाडे, प्रविण चव्हाण, अमित वासाडे, हेमंत राऊत, मनोज लेकुरवाडे, योगेश सावरकर, मारुती हुड, विनोद हूड, रमेश बालपांडे, मयुर सेलोकर, अभिजीत ठाकरे, सोनु मरघडे, राजकुमार वझेकर, सुनिल लेकुरवाळे,आकाश इंगळे सह सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.