संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर आणि आशिष मल्लेवार माजी उपसभापती पं.स. कामठी यांच्या सौजन्याने काल बुधवार दिनांक 11.1.2023 ला समाज भवन जिजामाता नगर तरोडी खुर्द येथे योजनांची माहिती, योजनांची अंमलबजावणी व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे करिता शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये नवीन राशन कार्ड तयार करणे, तसेच आरसीआयडी करणे,नवीन मतदान नोंदणी करणे,संजय गांधी तसेच श्रावण बाळ योजनाचा लाभ देणे,आधार कार्ड तसेच आधार दुरुस्ती,महिलांना शिलाई मशीन,महिला सशक्तीकरणासाठी प्रशिक्षण,शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि नागरिकांच्या वेळेवर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. 500 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.