संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
–कामठीत गीत, कविता, गझल रचनाने कामठीकर झाले मंत्रमुग्ध
कामठी :- कलम सांस्कृतिक संस्था कामठीच्या वतीने गुरुनानक चौक, सरस्वती कॉन्व्हेंट च्या क्रीडांगणावर काल 26 एप्रिल ला सायंकाळी 7 वाजता आयोजित अखिल भारतीय कवी संमेलनात कवी व कवयित्री ने सादर केलेल्या गीत, रचना ,गझलच्या काव्याने कामठीकर मंत्रमुग्ध होऊन वन्स मोअर करीत टाळ्यांचा पाऊस पाडला .या काव्य महोत्सवात श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने काव्य महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. या कवी संमेलनाची सुरुवात भागवताचार्य सच्चिदानंद महाराज यांचे हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले .यावेळी कलम सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक प्राध्यापक मनीष बाजपेयी, भोपाल इथून आलेले कवी जलाल मैकश, रायपूर इथून आलेले रमेश विश्वहार ,भोपाळ इथून आलेले दीपक शुक्ला दणादण ,कोरबा छत्तीसगढीतून आलेले हिरामनी वैष्णव ,खैरगाव इथून आलेले सत्यम चतुर्वेदी ,नागपूर येथील नीरज व्यास, गोंदिया येथील कवियत्री सरिता सरोज प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,उद्योगपती अजय अग्रवाल ,माजी जी प सदस्य अनिल निधान ,राजेश शर्मा,कामठी पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रडके , डॉ राजेंद्र अग्रवाल ,माजी नगरसेवक कपिल गायधने, राजेश दुबे, सुनील पाटील ,पंकज वर्मा, सुनील खानवाणी ,बबलू तिवारी ,डॉ विजय हिरणवार ,चंद्रशेखर तुपट ,रवीं गोयल, नरेश दावांनी ,विजय कोंडुलवार ,गोपाल सिरिया, कमल यादव , गोपालसिंग यादव, श्रीकांत शेंद्रे ,लाला खंडेलवाल ,प्रवीण आगाशे, सुषमा शिलाम, सुनील शिलाम ,रमेश वैद्य ,पिंकी वैद्य ,प्रतीक पडोळे ,उज्वल रायबोले ,संध्या रायबोले उपस्थित होते. कवयित्री सरिता सरोज यांनी मा सरस्वती वंदना सादर करीत कवी संमेलनाला सुरुवात केली, या देवी सर्वभूते नमस्ते नमोस्तुते गीत सादर करून प्रेक्षकांकडून टाळ्यांचा पाऊस पाडून घेतला कवी संमेलनात हास्य कवी सत्यम चतुर्वेदी यांनी कवितेच्या माध्यमातून काही न करता काही नागरिकांना समाजात आनंद होतो तर काही नागरिक आपल्या आई वडीलासह समाजाची सेवा करून मनुष्याच्या जीवनात आई वडीलाचे काय महत्त्व असते कवितेच्या माध्यमातून सादर करीत आई-वडिलांची सेवा सेवा उत्तम सेवा करण्याचे आव्हान केले कवी हिरामणी वैष्णव यांनी थंडी थंडी बहारे साथ लाया हु और एक हास्य कवी के माध्यम से फुल कुछ फुल लाया हु कविता सादर करीत कवी संमेलनात जलाल मैकस ,रमेश विश्वहार ,दीपक शुक्ला सह अनेक कवींनी एकापेक्षा एक बहारदार गीत कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून वन्स मोर करून टाळ्यांचा पाऊस पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मनीष बाजपेयी यांनी केले संचालन कपिल कपिल गायधने यांनी केले व आभार प्रदर्शन विजय कोंडुलवार यांनी मांनले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता गोपाल सिरिया ,पंकज वर्मा ,लाला खंडेलवाल ,विजय पाटील,हर्षद अढाऊ, श्रीकांत शेंद्रे, सुषमा शिलाम ,प्रवीण आगाशे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.