राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा

– विमानतळ, राजभवन व कोराडी येथे केली पाहणी

नागपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दिनांक 4 ते 6 जुलै 2023 पर्यतच्या नियोजित दौऱ्यासंबंधी आज प्रशासकीय यंत्रणेने विमानतळ, राजभवन व कोराडी मंदिर परिसरात प्रत्यक्ष भेट देवून सुरक्षेचा आढावा घेतला. राष्ट्रपती दौपदी मुर्मू प्रथमच महाराष्ट्रात येत असल्याने त्यांचेसाठी सर्व आवश्यक पूरक व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना याप्रसंगी प्रशासनातर्फे देण्यात आल्या. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपतींच्या आरोग्य व वाहतुक सुरक्षीततेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

राष्ट्रपती यांच्या 5 जुलै रोजीच्या नागपूर येथील कार्यक्रमांमध्ये कोराडी मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवी दर्शन, सांस्कृतिक केंद्राची पाहणी व लोकार्पण असे कार्यक्रम नियोजित असून मंदिरातील अन्नछत्र सभागृहात त्या नागरिकांना संबोधीत करणार आहेत. या सभागृहात प्रवेशासाठी अतिमहत्वाचे व्यक्तींकरिता एक दालन आणि नागरिक, पत्रकार व इतर सर्वांसाठी एक असे एकूण दोन प्रवेशदालन राहणार आहे. त्यामुळे विहित वेळेपूर्वी संबंधितांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या आगंतुकांच्या वाहनांसाठी मंदिरातील नियमीत वाहनतळ उपलब्ध करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी खाद्यपदार्थ व पाण्याची बाटली किंवा इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर (विशेष शाखा), आर्चित चांडक (आर्थीक गुन्हे शाखा), अनुराग जैन (परिमंडळ एक) तसेच विमानतळ प्राधिकरण, राजभवन, महसुल प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन तसेच इतर विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरला मोतीबिंदूमुक्त करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्धार

Sat Jul 1 , 2023
नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने कर्ण व नेत्र दोष तपासणी शिबिरे नियमित आयोजित केली जात आहेत. आतापर्यंत हजारो लोकांचे डोळे तपासण्यात आले आहेत. येत्या काळात संपूर्ण नागपूर मोतीबिंदूमुक्त करायचे आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाला, २७ मे रोजी स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com