– निवडणूक खर्च निरीक्षकांनी केले मार्गदर्शन
गडचिरोली :- जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ६९-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात आज भेट देऊन निवडणूक तयारीचा यंत्रणेकडून आढावा घेतला. त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय नामनिर्देशन, छाननी, चिन्ह वाटप आणि दैनंदिन अहवाल शाखेत निवडणूक कामकाजाची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम, अहेरीचे निवडणूक निर्णय अधिकारी कुशल जैन यावेळी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षकांनी केले मार्गदर्शन
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी तहसिल कार्यालय अहेरी येथे निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष देण्याचे व खर्चाच्या लेखानोंदी घेण्याबाबत तसेच एसएसटी व एफएसटी पथकाला करावयाच्या कार्यवाहीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील, एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, भामरागड चे तहसीलदार किशोर बागडे, सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमारे तसेच संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.