संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक असलेला दुर्मिळ पट्टेरी मण्यार साप आज नागपंचमीच्या दिवशी कामठी तालुक्यातील लिहिगाव येथील ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत आढळल्याची घटना आज सकाळी 8 वाजता निदर्शनास आली. दुर्मिळ अन् अत्यंत जहाल असलेला हा मण्यार साप चार फूट लांबीचा असून या सापाला कामठी च्या सर्पमित्रांनी पकडले. व तदनंतर सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले.
ही यशस्वी कारवाही वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी कामठी चे प्रशांत बोरकर आणि अनिल बोरकर यांनी केली.
– मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात.