पर्यावरणपुरक सजावट व सौंदर्यीकरणासाठी मिळणार १ लाखांचे बक्षीस

– मनपातर्फे गणेशोत्सव सजावट/ देखावे व सौंदर्यीकरण स्पर्धा

चंद्रपूर :- येत्या ७ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्सवाच्या माध्यमातुन पर्यावरणपुरक वातावरण निर्मिती करणाऱ्या गणेश मंडळांना अनुक्रमे १ लक्ष, ७१ हजार व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

सोमवार १२ ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात सर्व गणेश मंडळांसाठी आयोजीत बैठकीत चर्चा करतांना आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी स्पर्धेची माहिती दिली. वृक्षारोपण,खत निर्मिती,सामाजिक सलोखा,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू निर्मिती,किल्ले स्वच्छता शहराची सुंदरता, ध्वनिप्रदूषण,रेन वॉटर हार्वेस्टिंग अश्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्द्यांना अग्रस्थानी ठेवुन ही स्पर्धा आयोजीत करण्यात येते.

मात्र उत्सव काळात नोंदणी होणाऱ्या ३०० पेक्षा अधिक गणेश मंडळांचा अपेक्षित प्रतिसाद स्पर्धेस लाभत नाही. सामाजिक सलोखा निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.वर्गणी गोळा करून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यामुळे उत्सवात परिसरातील अनुभवी,ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य मंडळांनी घ्यावे व मोठ्या संख्येने गणेश मंडळांनी स्पर्धेत भाग घेऊन पर्यावरण पुरक गणेशोत्सव घेण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले. 

स्पर्धेत विविध कामांवर आधारीत गुण दिले जाणार असुन त्रयस्थ परिक्षकांद्वारे परीक्षण केले जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी जर गणेश मंडळांची मिरवणुक शिस्तबद्ध असली तर त्यावरही विशेष गुण दिले जाणार आहेत. १६ ऑगस्टपासुन पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या आवश्यक परवानगी घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे एक खिडकी प्रणाली मनपातर्फे सुरु करण्यात येत आहे.

या आढावा बैठकीस उपायुक्त मंगेश खवले,पोलीस विभाग,महावितरण केंद्र यांचे प्रतिनिधी, शहर अभियंता विजय बोरीकर,अमोल शेळके,जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, इको प्रो संस्थेचे बंडु धोत्रे, गिरीराज प्रसाद,सिटी कॉर्डीनेटर जय धामट,गणेश मंडळ व मुर्तीकार मंडळांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

स्पर्धेत गुण कशावर दिले जाणार :

६० टक्के गुण – २२ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर या पंधरा दिवसांत गणेश मंडळांतर्फे त्यांच्या परिसरात उपलब्ध भिंतीवर / जागेवर पेंटिंग,माझी वसुंधराचा लोगो व पंचतत्व लोगो लावणे / पेंटिंग करणे,वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टीकाऊ वस्तु बनविणे,किल्ला स्वच्छता,लोकसहभागातुन सौंदर्यीकरण / बेंचेस / ट्री गार्ड / शिल्प / कारंजे उभारणे,परिसरातील दुकानांमध्ये डस्टबिनचा वापर व केलेल्या कामाची प्रसिद्धी यावर ६० टक्के गुण दिले जाणार आहे.

४० टक्के गुण – स्थापनेपासुन ते विसर्जनापर्यंत गणेश मंडळ परिसरात पर्यावरण पूरक मूर्तीची स्थापना व सजावट,ध्वनिप्रदूषण रहित वातावरण,सर्व शासकीय परवानगी,सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा,निर्माल्यपासुन खत निर्मिती,परिसरात स्वच्छता व शिस्त ,सामाजीक संदेश देणारे देखावा तयार करणे,शिस्तबद्ध मिरवणुक इत्यादीवर ४० टक्के गुण देण्यात येणार आहे.

नोंदणी कशी करावी –

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd-Y9CI8Cd6kT0SGD1Qy-FOmAqbXJ5dfxzwsbNuq78lAaUZhA/viewform या लिंकवर अथवा 9175298825 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अटी व शर्ती :-

मंडळ हे धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेले किंवा चंद्रपूर मनपाची परवानगी आवश्यक.

मंडळ चंद्रपूर शहरातील असावे

कोणतेही साहित्य मनपाद्वारे पुरविण्यात येणार नाही.

सौंदर्यीकरणाची जागा ही चौक किंवा सार्वजनिक स्थळ असावे.

मनपातर्फे झाडे व पेंटिंग कलर मर्यादित) पुरविण्यात येईल.

बक्षीस रक्कम व रोख रक्कम कमी / जास्त करण्याचा अधिकार मनपाकडे.

बक्षिसे :

प्रथम पारितोषिक – १ लक्ष व ट्रॉफी व सन्मानपत्र.

द्वितीय पारितोषिक – ७१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.

तृतीय पारितोषिक – ५१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.

टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु – २१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.

प्रोत्साहनपर ०५ पारितोषिक – २१ हजार, ट्रॉफी व सन्मानपत्र.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चाचेर मंडल में भारतीय जनता पार्टी का एकदिवसीय अधिवेशन संपन्न

Wed Aug 14 , 2024
कोदामेंढी :- भारतीय जनता पार्टी का एक दिवसीय अधिवेशन चाचेर के परमात्मा एक भवन में पूर्व विधायक मल्लिकार्जुन रेड्डी इनके अध्यक्षता में 12 आगस्ट को संपन्न हुआ. अधिवेशन की शुरुआत झेंडा वंदन एवं दिपप्रज्वलन से कि गई. अधिवेशन में फिर से तिसरी बार मोदी सरकार स्थापन होने पर पंतप्रधान नरेंद्र मोदीं का अभिनंदन प्रस्ताव एवं किसानों को मुफ्त बिजली देने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!