अमरदिप बडगे
गोंदिया / आमगाव – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलिस निरिक्षक व एका खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
आमगाव येथिल तक्रारदार हा आधी जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्याच्या विरोधा आमगाव पोलिसात तक्रार आली असुन त्या वर गुन्हा दाखल होणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगीतले त्यासाठी तक्रारदार याला गुन्हा दाखल न करण्यासाठी 5 लाख रुपये लाचेची मागणी एका खाजगी इसमा मार्फत करण्यात आली. तडजोडी अंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले. पण तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यानी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार सापळा रचत आरोपी सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत पवार, व खाजगी इसम अनील सोनकनवरे, याला लाचेचा पहिला हफ्ता म्हणुन 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.