फाल्गुन पौर्णिमा निमित्त एक दिवसीय विपस्सना ध्यान शिबीर संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– शेकडो साधक – साधिकांनी घेतला ध्यान शिबीराचा लाभ

कामठी :- कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर येथे रविवार दिनांक २४ मार्च २०२४ रोजी फाल्गुन पौर्णिमाच्या निमित्ताने सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० वाजता पर्यंत एक दिवसीय विपस्सना ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य यांनी सहभागी झालेल्या साधकांना मार्गदर्शन केले.

या शिबीरामध्ये ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे, रेखा भावे, रजनी लिंगायत सह शेकडो साधकांनी सहभागी घेतला होता.

ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर मध्ये १० दिवसीय, ३ दिवसीय व दर पौर्णिमेला १ दिवसीय विपस्सना ध्यान शिबीराचे आयोजन नियमित केल्या जात असते. या शिबीरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपर्यातुन साधक सहभागी होवून ध्यान शिबीराचा लाभ घेत असतात. शिबीरामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर राज्यातुन सुध्दा साधकांना ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर मध्ये ध्यान करण्याची संधी मिळत असल्याची माहीती ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर च्या प्रमुख ॲड सुलेखा कुंभारे यांनी दिली….

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बुलेट ट्रेन’च्या गतीने होईल देशाचा विकास - सुधीर मुनगंटीवार

Sun Mar 24 , 2024
– संसद भवनात छत्रपतींचे स्‍मारक उभारण्याचे स्वप्न – आरोग्‍याची गंगोत्री ‘दिल्‍ली-व्‍हाया-मुंबई’ पोहोचावी – योगनृत्‍य परिवारातर्फे जाहीर सत्‍कार चंद्रपूर :- यंदा लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरणार असून पंतप्रधान विश्‍वगौरव नरेंद्र मोदी यांचा विकासाचा झंझावात बघता देशाच्‍या विकासाची गाडी ‘बुलेट ट्रेन’पेक्षा वेगाने धावेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्‍कृतिक कार्य आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला. योगनृत्‍य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com