नागपूर महानगरपालिका, शिक्षण विभागाद्वारे शिक्षक-मित्र आनंद-निकेतन शाळा, सेवाग्राम येथे एकदिवसीय अभ्यास दौरा संपन्न  

नागपूर :- नुकतेच गुरुवारला, नागपूर महानगरपालिका, शिक्षण विभाग व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंचल गोयल, अति. आयुक्त मार्गदर्शनाखाली प्रस्तावित साधना सयाम शिक्षणाधिकारी यांचा निर्देशानुसार गुणवत्ताविकासाठी निवडक शिक्षकांचा व अधिकाऱ्यांचा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व शाळा निरीक्षक व शिक्षक मित्र अभ्यासदौऱ्यात उपस्थित होते. सदर अभ्यासदौरा सेवाग्राम येथील गांधीजींच्या मूल्य व तत्वावर आधारित नयी तालीम संस्थेद्वारे संचालित ओळखल्या जाणाऱ्या नावीन्य पूर्ण अश्या आनंद निकेतन शाळा येथे आयोजित करण्यात आला होता.

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण नागपूर महानगरपालिकामध्ये राबविण्यास सुरुवात झाली आहे. तरी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेतील उपक्रमांचे उत्कृष्टरित्या अंमलबजावणी व वेळोवेळी उपक्रमांचा सहनियंत्रण व मूल्यांकन यासाठी महानगरपालिकेद्वारे “शिक्षक मित्र” उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शैक्षणिक पद्धत तथा उपक्रम समजून घेऊन शैक्षणिक उपक्रमांचे शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणीच्या व नवाचाराद्वारे विविध शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करून गुणवत्तापूर्ण शिक्षणात भर घालण्याचा उद्देशाने एकदिवसीय अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. सदर अभ्यास दौऱ्यामध्ये शाळा निरीक्षक निवडक शिक्षक मित्र व LFE आणि आकांक्षा यांचे सभासद उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

2024 हे वर्ष नव मतदारांसाठी विशेष - जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Sun Feb 4 , 2024
– पात्र नवमतदारांनी नावनोंदणी करून आपले अधिकार बजवावे असे आवाहन भंडारा :- तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ देशभरात साजरा केला जातो पण 2024 हे वर्ष आपणा सर्वांसाठी आणि नव मतदारांसाठी विशेष आहे कारण या वर्षी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होणार आहेत. मतदानाचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे आणि जास्तीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com