मासिक सभा गाजणार, ग्रामपंचायत सदस्यगण व ग्रामस्थ 5,98,474 रुपयाच्या गावात मुक्कामी राहत नसलेल्या सरपंच आशिष बावनकुळे यांना हिशोब मागणार

कोदामेंढी :- येथील लोकसंख्या 3829 असून पोलांची संख्या फक्त 296 असून दिनांक 20 /05/ 2024 ला नागपूर येथील एम. एम. इंटरप्राईजेस या दुकानातून पथदिवे चार लक्ष 88 हजार 474 रुपयाचे गावात अधिकृत निविदाधारक दुकानदार असताना अनधिकृतपणे खरेदी करण्यात आले व ते गावात लावण्यात पण आले नाही. त्यामुळे पथदिवे खरेदी न करताच बोगस बिल लावून मुक्कामी न राहणाऱ्या सरपंच आशिष बावनकुळे यांनी अनियमितता केल्याची दाट शक्यता असल्याची गावात चर्चा आहे .त्याची नोंद प्रोसिडिंगवर फक्त 70000 घेण्यात आली.

तसेच दिनांक 30 /09/ 2024 ला पाणी मार्ग बांधकाम मजूर पगार या नावाखाली ग्रामपंचायत सदस्यांना अनभिज्ञ ठेवून एक लक्ष दहा हजार रुपये काढण्यात आले.

असा एकूण पाच लक्ष 98 हजार 474 रुपयाच्या हिशोब उद्या 9 ऑक्टोबर बुधवार ला होणाऱ्या मासिक सभेत ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्यगण व गावकरी मुक्कामी राहत नसलेल्या सरपंच आशिष बावनकुळे यांना विचारणार असून ते काय उत्तर देतात याकडे संपूर्ण गावासह परिसर, तालुका व जिल्ह्याचे लक्ष वेधलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत

Wed Oct 9 , 2024
नवी मुंबई :- सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त असलेली वाहने तळोजा पोलीस स्टेशन आवारात शिंप्ट केली आहेत. मोटार सायकली स्कुटर , रिक्षा बरेच दिवसा पासून उभी असून या वाहनांच्या मालकाचा शोध घेणे व लिलाव प्रक्रिया पूर्ण आवश्यक असल्याने मूळ मालकास कागदपत्रासह सानपाड पोलीस ठाणे येथे 7 दिवसात हजर राहण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सानपाडा पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com