संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पारशिवनी – तालुकातील मौजा येसंबा शिवारातील शेतात मोकळया जागेवर बांधलेली पाळीव गाई पैकी एका जर्शी कारवळवर पहाटे हल्ल्या करून बिबटट्याने ठार करून शिकार केल्याने पिडीत शेतक-यास नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पेच व्याघ्र प्रकल्प रामटेक वन परिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेज मधिल येसंबा गावच्या शेत शिवारात पिडित शेतकरी पशु मालक नामदेव सोनेकर यांनी आपल्या मालकीचे प्राळीव गाई व जनावरे गावातील शेतात मोकळ्या जागेवर रविवार (दि.३०) सप्टेंबर ला सायंकाळी बांधुन घरी येऊन झोपले. सोमवार (दि.१) ऑक्टोंबर ला नेहमी प्रमाणे सकाळी नामदेव सोनेवर हे पाळीव गाई ला चारा-पाणी टाकण्यासाठी गेले. असता जर्शी कारवळ ला बिबटयाने पहाटे सकाळी ठार केल्याचे दिसल्याने घटनेची माहीती गावचे पोलिस पाटिल शालु घरडे यांच्या सहाय्याने वनविभाग पटगोवारीचे वनरक्षक एस.जी.टेकाम यांना माहीती दिली. तात्काळ वनरक्षक एस.जे.टेकाम यांनी ही माहीती आपले वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सहाय्यक यांना दिल्याने वन क्षेत्र सहाय्यक अशोक दिग्रेसे, वनरक्षक एस जे.ट़ेकाम व वरिष्ठाचे आदेशाने वनकर्मी सोबत घटनास्थळी पोहचु न निरिक्षण करित पंचाचा सहाय्या ने पंचनामा करून हयांनी पुढील कारवाईस वरिष्ठाना अहवाल पाठविली. पाळीव जर्शी कारवळ बिबट्याने शिकार करून ठार केल्याने शेतक-यास वन विभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी गावातील नागरीक व पिडित शेतकरी पशु मालक नामदेव सोनेकर हयांनी केली आहे.