-67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना मानवंदना वाहणार
मुंबई :-स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार, जगामध्ये भारत देशाची ओळख लोकशाही राष्ट्र म्हणून निर्माण करणारे, प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदेमंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी मुंबई येथील चैत्यभूमीवर (दादर) नतमस्तक होतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे बुधवारी 6 डीसेंबर ला सायं 5:30 वाजता चैत्यभूमी येथे विराट जाहीर अभिवादन सभा होणार आहे. अभिवादन सभा दादर, चैत्यभूमी येथील बाजी प्रभु उद्यानाच्या बाजूला सायं 5:30 वाजता करण्यात आलेले आहे. सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लॉगमार्च प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राज्य कमेटीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सभेला मुंबई प्रदेश कमिटी, जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष,वार्ड अध्यक्ष यांच्यासह सर्व प्रमुख भीमसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय वाघमारे यांनी केले आहे.