ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भाविकांची अलोट गर्दी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-सकाळी 9 वाजता विशेष बुद्धवंदना व धम्मध्वजाद्वारे बाबासाहेबांना सलामी

कामठी ता प्र 23:-67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दोन दिवसांपूर्वी पासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखोच्या संख्येनी आंबेडकरी अनुयायांची अलोट गर्दी उसळून दिसत आहे.उल्लेखनीय आहे की, यावर्षी दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे 10 लाखाच्या वर भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या गर्दीची शक्यता गृहीत धरून ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.ड्रॅगन पॅलेस टेम्पल व ड्रॅगन पॅलेस कॅम्पस मध्ये असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र तसेच विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे आकर्षक विद्दूत रोषणाई करण्यात आली असून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शांती, मैत्री व लोककलल्यांणकारी विचाराचे प्रतीक असलेले विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी शांती शिल्प म्हणून जगप्रसिद्ध होत आहे.त्यामुळे दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांची गर्दी आता ड्रॅगन पॅलेस टेम्पल कडे सतत वाढत आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर सकाळी 9 वाजता पुज्यनिय भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना होईल.तसेच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजश्री थाटातील पूर्णाकृती शिल्पाला 67 मीटरच्या धम्मध्वजाद्वारे ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत विशेष सलामी देण्यात येणार आहे.

दिक्षाभुमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत आपली बस सेवा

नागपूर महानगर पालीका परिवहन विभागाच्या वतीने दिनांक २२ | आक्टोंबर ते २६ आक्टोंबर दरम्यान दिक्षाभुमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत १५९ आपली बस सेवा चालविण्यात येणार आहे. हया विशेष बसेस दिक्षाभुमी ते अंबाझरी, नारा-नारी, वैशाली नगर, नागसेन नगर, राणी दुर्गावती चौक, आंबेडकर चौक, या मार्गावरून ड्रॅगन पॅलेस, कामठी येथे पोहोचेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी - गुरुप्रसाद मदन

Mon Oct 23 , 2023
– मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास प्रत्येक पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी राहणार आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलू उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन सर्वांनी आवर्जुन पहावे, असे आवाहन भारतीय बौध्द परिषदेचे विश्वस्त गुरुप्रसाद मदन यांनी आज केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालयातर्फे चिंचोली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com