संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बकरा कमेला कादर झेंडा चौकात शेजारच्या घरी आलेल्या नविन ई रिक्षात फिरायला गेलेली चार वर्षोय बालिका खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री साडे नऊ दरम्यान घडली असून मृतक बालिकेचे नाव मरियम फातिमा वल्द मुशीर खान वय 4 वर्षे रा बकरा कमेला, कादर झेंडा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक बालिकेच्या शेजाऱ्याने काल नवीन ई रिक्षा विकत आणले असता या उत्साहाच्या नादात मुलांना ई रिक्षावर बसवून मुलांना फिरवून आणण्याच्या नादात स्वतःच्या लहान लहान मुला बाळासह शेजारची लाडकी चार वर्षीय बालिकेला सुद्धा बसवून फिरायला नेले दरम्यान हा ई रिक्षाचा अचानक तोल जाऊन रस्त्यावर उलटल्याने या ई रिक्षात बसलेली सदर मृतक चिमुकली बालिका खाली पडली असता तिला उचलले असता ती निपचित अवस्थेत असून कुठलीही हालचाल करीत नव्हते दरम्यान त्वरित तिला कामठी च्या रॉय हॉस्पिटल ला उपचारार्थ घेऊन गेले असता डॉक्टरने आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केल्याने सर्वाना एकच धक्का बसला.तर मृतक बालिकेच्या कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.