महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक विजय संपादन करणाऱ्या धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा संत-महंतांच्या उपस्थितीत नागपूर येथे १९ डिसेंबरला सन्मान सोहळा !

– ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन !

नागपूर :- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा सपशेल पराभव करून ऐतिहासिक विजय संपादन करणाऱ्या हिंदु धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा संत-महंत, समस्त मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत १९ डिसेंबरला नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा झाशी राणी चौक, नागपूर येथील ‘विदर्भ साहित्य संघा’च्या सभागृहात सायंकाळी ५.३० ते रात्री ८ पर्यंत या कालावधीत होणार आहे. ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक तथा ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट हे पत्रपरिषदेत बोलत होते.पत्रपरिषदेला हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वय श्रीकांत पिसोळकर, नागपूर येथील श्री बृहस्पती मंदिराचे विश्वस्त रामनारायण मिश्र, ‘श्री पंचमुखी हनुमान मंदिरा’चे विश्वस्त दिलीप कुकडे, ‘राष्ट्रीय युवा गठबंधन’चे संस्थापक अध्यक्ष राहूल पांडे आणि भाजपच अनिल शर्मा हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी म्हणून शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सर्वश्री भरतशेठ गोगावले, योगेश कदम, आशिष जयस्वाल, तर भाजपचे मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नीतेश राणे, अतुल सावे, आकाश फुंडकर, संजय सावकारे, पंकज भोयर, तसेच शिवसेनेचे आमदार सर्वश्री प्रदीप जयस्वाल, चंद्रकांत सोनावणे, अमोल खताळ, बालाजी किणीकर, तर भाजपचे आमदार सर्वश्री मंगेश चव्हाण, सुनील कांबळे, सत्यजित देशमुख, अतुल भातखळकर, प्रतापराव अडसर, महेश लांडगे, सुरेश भोळे, शंकर जगताप, सचिन कल्याणशेट्टी, नारायणराव कुचे, संजय केळकर, कालीदास कोळंबकर, सुभाष देशमुख यांच्यासह अनेक विजयी आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही महासंघाच्या वतीने नागपूर येथील विधान भवनात प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. चांगला कार्यक्रम घेतल्याची प्रतिक्रिया मा. मुख्यमंत्र्यांनी भेटीत व्यक्त केली. या सोहळ्यासाठी नागपूर आणि विदर्भातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी ७०५७३६८८६० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

Wed Dec 18 , 2024
नागपूर :- मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री लोढा यांचे स्वागत केले. राज्यातील रोजगार निर्मिती क्षेत्र, पायाभूत सुविधा, केंद्र व राज्य शासनाकडून विकासासाठी होत असलेले प्रयत्न आदी विविध बाबींची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!