नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरील, डॉ. राजेंद्र प्रसाद युवा कल्याणकारी संस्था उमरेड, नागपूर या संस्थेच्या वतीने न्यू प्लॅनेट 5 ‘या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.एका रोबोटिक प्रयोग शाळेत या नाट्याला सुरवात होते. आणि सुरवातीलाच mf 69 या अवकाशातील प्रयोगात डॉ. ध्यांडी यांना अपयश येत पण ते त्या वर थांबत नाही तर आपल्या पुढल्या रोबोटिक प्रयोगात मग्न होतात. तयार केलेल्या रोबोनी तिसऱ्या महायुद्धात सहभाग घ्यावा या साठी ते रोबो ची निर्मिती करू लागतात. यंत्र आणि माणूस कृत्रिम बुद्धिमता आणि यंत्र अशी अनेक गुंतागुंत असलेली ही। कथा घडू लागते सोबतीला परशु या पात्रा द्वारे मानवी जीवनावर या तिसऱ्या महायुद्धाचे काय परिणाम होत आहे.याचेही चित्रण समांतर चालू लागते.रोबर्बोच्या मनात मानवी संवेदना ची जागृती होणे आणि त्यांनी स्वतः निर्णय घेणे अश्या अंगाने कथानाट्य तिस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडू लागते रोबो चे प्रेम. मानवी क्रूरता निसर्ग, पंचमहातत्वे अश्या प्रत्येक अंगावर लेखकाने भाष्य करण्याचा आणि मानवी जीवनात त्याचे काय महत्व आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला ही चांगली गोष्ट आहे पण ह्या नाट्याला ज्या प्रकाराल हाताळल्या गेले तो प्रकार निवडण्यात मात्र ते चुकले ह्या कथेला वास्तववादी स्वरुपात हाताळले असते तर ते अधिक उत्तम झाले असते असे वाटते.
यंत्र आणि मानव असा संघर्ष घडू लागतो मानवतेचे संरक्षण आणि विनाशकारी वृत्तीचा विनाश हा यंत्रांनी घेतलेला विचार, निर्णय यावर हे नाटक संपते.युटोपियन डीस्टोपियन प्रकारातील कथा कादंबऱ्यानी वाचकांना नेहमीच भुरळ घातली आहे. अनिमल फार्म 1984 हंगर गेम्स, याच धर्तीवर लेखक दिग्दर्शक धनंजय मांडवकर यांनी हा प्रयोग ‘न्यू प्लनेट 5’ या नाटकात करण्याचा प्रयत्न केला पण ते यात अपयशी ठरले. त्यांना वास्तवा पासून आणि नाट्याच्या वास्तविक मांडणी पासून त्यांना दूर जाता आले नाही. त्यांच्या या प्रयत्नाला नक्कीच दाद दिली पाहिजे पण ते यात असफल ठरले हे नाकारता येणार नाही.नाटकातील कलावंतानी मात्र त्यांच्या साठी निर्माण झालेल्या पात्राला मात्र पूर्ण न्याय दिला असे नाटक बघताना जाणवत राहिले अजय सनेसर यांनी साकारलेला परशु त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या दृश्यात आपल्या अभिनयाचे पूर्ण कसब लावताना दिसून आला. त्याची मेहनत पदोपदी जाणवत होती.
डॉक्टर च्या भूमिकेतील मयूर कातोरे याला पात्रावर अधिक परिश्रम गरज होती असे वाटते लव यू च्या भूमिकेत आदित्य बुलकुदे यांनी नक्कीच जीव ओतला संयत संवाद, हळुवार प्रेम दर्शविण्यात आदित्य नक्कीच यशस्वी ठरला आहे. त्याला उतम साथ दिली ती हेलो ची भूमिका करणाऱ्या आर्या लधवे हिने एकाच नाटकात हलो आणि वसू अशी दोन पात्रे साकारून आर्याने तिच्यातील अभिनय क्षमतेचा प्रत्यय दिलेला आहे. तांत्रिक बाजू – उत्तम संगीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले नेपथ्य यांनी लक्ष वेधून घेतले दिगदर्शक म्हणूनही धनंजय ला हा नवा प्रकार हाताळता आला नाही असेच म्हणावे लागेल. तांत्रिक नाट्य निवडून दिगदर्शक त्याला तंत्रज्ञानाच्या उंचीवर नेवू शकले नाही.धनंजय मांडवकर लिखित व दिग्दर्शित या नाटकात आर्या लधवे, आदित्य बुलकुंदे अजय सनेसर, मयूर कातोरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.या नाटकात प्रकाश योजना अमित शेंडे, नेपथ्य आयुष बुलकुंदे, पार्श्वसंगीत सोहेल अगवान, वेशभूषा रविता सनेसर आणि रंगभूषा लावण्या सनेसर यांची होती,आज सायंकाळी ७ वा.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या नागपूर केंद्रात प्राथमिक फेरीत कृती थिएटर्स अँड स्पोर्ट्स अकादमी संस्था, नागपूर तर्फे चंद्रकांत शिंदे लिखित आणि रितिक श्यामकुमार दिग्दर्शित मोमोज हे नाटक सादर होईल.सिव्हिल लाइन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ही नाट्य स्पर्धा सुरू आहे.