संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- ब्रिटिश कालीन जुन्या कन्हान नदी पुलावरून खाली पडलेल्या गाईला सर्प मित्र मंगेश मानकर आणि त्याचा सहका-यानी नदीतुन वर बाहेर काढुन दवाखान्यात नेऊन उपचार करित आदर्श जीवदया केंद्र लकड़गंज नागपुर येथे दाखल करून त्या गाईला जीवनदान दिले.
कन्हान नदीवरील नविन पुलाचे उद्घाटन झाल्या नंतर ब्रिटिश कालीन जुन्या पुलावरुन कामठी नागपुर ला जाणा-या फक्त सत्रापुर येथील लोकांची ये-जा असुन वाहनांची वाहतुक बंद झाल्या सारखीच आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ब्रिटिश कालीन कन्हान नदी जुन्या पुलावरील रेलिंग असामाजिक, गुन्हेगार तत्वांच्या चोरानी चोरुन नेली. त्यामुळे जुन्या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वाढली आहे. सध्याच्या परिस्थितीत जुन्या पुलावर मोकाट जनावरे फिरत असुन नुकतीच फिरता फिरता एक गाय पुलावरुन खाली नदीत पडल्याने तिला मार लागुन जख्मी झाली. यास जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्प मित्र मंगेश मानकर यांचे कडुन प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.९) जुलै ला रात्री ११ वाजता दरम्यान एक गाय कन्हान नदी वरील ब्रिटिश कालीन जुन्या पुलावरुन खाली पडली. रात्रभर जख्मी अवस्थेत ती गाय सदर ठिकाणी पडुन राहीली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच परिसरातील नागरिकांना हा प्रसंग आढळल्याने त्यांनी घटनेची माहिती सर्प मित्र मंगेश मानकर यांना देऊन बोलाविले. मंगेश मानकर आणि त्यांचे सहकारी सुजल सरोदे, प्रफुल सावरकर, गौरव मेश्राम, रितेश पाठक, अभिजीत सराटकर, हर्षल मस्के, शैलेश हिंगे यांनी घटनास्थळी पोहचुन गाई ला उचलुन कन्हानच्या जनावराचे प्राथमिक आरोग्य केंन्द्रा त नेले, तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता सर्प मित्रांनी गाईला आदर्श जीवदया केंद्र लकड़गंज नागपुर येथे दाखल करून त्या जख्मी गाईला जीवनदान दिले आहे. या घटने नंतर प्रशासनाने तात्काळ ब्रिटिश कालीन जुन्या पुला वर रेलिंगची व्यवस्था करून या जुन्या ऐतिहासिक पुलाची देखभाल करावी. अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतुन जोर धरू लागली आहे.