संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ७९ लाख ८६ हजार १७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त, सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
– अन्न व औषध प्रशासन विभागाची खंडाळा शिवारात मोठी कारवाई
कन्हान :- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधि कारी सहाय्यक आयुक्त नागपुर-जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर खंडाळा (घटाटे) शिवारात सुगंधित तंबाखु व शिखर पान मसाला वाहतुक करणाऱ्या कंटेनर ला पकडुन ७९ लाख ८६ हजार १७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करित सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली आहे.
प्राप्त माहिती नुसार अन्न व औषध प्रशासन अधिका-याना मंगळवार (दि.१६) रोजी गुप्त माहिती मिळाली कि जबलपुर कडुन नागपुरच्या दिशेने कंटेनर क्रमांक केए ०१ एएम १६८१ मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखु व पान मसालाची वाहतुक होत आहे. अश्या माहितीने अन्न व दक्षता सहाय्यक आयुक्त आ सु महाजन, अन्न व दक्षता सुरक्षा अधिकारी य बा दहातोंडे, अ या सोनटक्के सह नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर सर्च ऑपरेशन सुरु केले असता रात्री ११ वाजता महामार्गावरील खंडाळा शिवारातील कुंभलकर धाब्यावर भारत बेंझ कंपनीचा कंटेनर क्र. केए ०१ एएम १६८१ मिळुन आल्याने अधिकाऱ्यांनी कंटेनरचा गाडीच्या चालक विपीन विजेंद्रसिंग राणा वय २६ वर्ष राह. बडेरा जि. मथुरा उत्तर प्रदेश यास कंटेनर मध्ये काय आहे व बिल्टी मागितला असता त्यानी सुगंधित तंबाखु व शिखर पान मसाला असल्याचे सांगितल्याने अधिका-यानी सदर कंटेनर ट्रक कन्हान पोलीस स्टेशन ला नेऊन पाहणी केले असता त्यात ५७७२ किलो ग्राॅमचा एस.एस.वन सुगंधित तंबाखु व शिखर पान मसाला किंमत ७९ लाख ८६ हजार १७८ रुपयांचा मुद्देमाल वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी अन्ना सुरक्षा अधिकारी सह आयुक्त ललित प्रभुदास सोयाम यांचा तक्रारीवरून बुधवार (दि.१७) जुलै ला सकाळी ९ वाजता आरोपी १) विपीन विजेंद्र सिंग राणा, २) अमित राकेश राणा, ३) मुकेश बलबिर चहल, ४) दिनेश वर्मा, ५) संजय सेल्स एजंन्सीचा मालक, ६) दिपक अग्रवाल यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.